सुरजागड इस्पात प्रकल्पामुळे देशातील 30 टक्के स्टील उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा
Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स मेटल्सनंतर आता सुरजागढ इस्पात हे दोन मोठे प्रकल्प आल्याने भविष्यात देशाचा 30 टक्के स्टील गडचिरोलीमध्ये बनेल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
![सुरजागड इस्पात प्रकल्पामुळे देशातील 30 टक्के स्टील उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा Gadchiroli News 30 percent steel production in the country due to surjagad ispat iron and steel factory in Gadchiroli alone Claimed by DCM Devendra Fadnavis सुरजागड इस्पात प्रकल्पामुळे देशातील 30 टक्के स्टील उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/17/09bbaa421df6e79282dc1807411510b71721215293106892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gadchiroli News गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आज गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ गावात सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याचा भूमिपूजन पार पडले आहे. तब्बल 10,000 कोटी रुपयांची गुंतवणुकेतून तयार होणाऱ्या या लोह पोलाद कारखान्याचे भूमिपूजन आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या प्रमुख उपस्थीत हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय. विदर्भ आणि गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी असल्याचेही बोलल्या जात आहे आहे.
भविष्यात देशातील 30 टक्के स्टील उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये
अशातच, आतापर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra News) शेवटचा जिल्हा म्हणून गडचिरोली (Gadchiroli) ओळखलं जात होता. पण आता गडचिरोली शेवटचा नाहीतर पहिला जिल्हा असेल. सोबतच सुरजागड इस्पातमुळे 7000 रोजगार निर्माण होऊन गडचिरोली जिल्हा स्टील उत्पादनाचे केंद्र बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात गडचिरोली भारताचा स्टील हब होईल. गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स मेटल्स नंतर आता सुरजागढ इस्पात हे दोन मोठे प्रकल्प आल्याने भविष्यात देशाचा 30 टक्के स्टील गडचिरोलीमध्ये बनेल असा दावाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी आयरन स्पॉंज कारखान्याच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
लोह पोलाद प्रकल्पात 80 टक्के स्थानिक तरुणांना नोकरी
गडचिरोली येथील लोह पोलाद प्रकल्पात 80 टक्के स्थानिक तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे, अशी अट आम्ही घातली असल्याचेही फडणवीस म्हणाले. सुरजागड टेकडीवर ठाकूर बाबा हे आदिवासी समाजाचे आराध्य देव यांचा स्थान आहे. तिथे लोह खनिज उत्खनन होताना ठाकूर बाबा यांच्या स्थानाला धक्का ही बसणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची हमी ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मराव बाबा आत्राम यांचेही खास कौतुक करण्यात आले. सुरजागड इस्पात या प्रकल्पासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची वडिलोपार्जित दीडशे एकर जमीन कारखान्यासाठी दिली असून ही कौतुकास्पद बाब असल्याचे अजित पवार म्हणाले. या प्रकल्पामुळे या भागात किती मोठे बदल झाले याची तुम्हाला कल्पना नसल्याचे अजित पवार म्हणाले.
सुरजागड इस्पात प्रकल्पाची ही आहेत वैशिष्ट्ये
हा प्रकल्प 350 एकर क्षेत्रात होणार आहे.
यात 1.6 दसलक्ष टन क्षमतेचा पहिला टप्पा असणार. तर पुढे या कामाच्या क्षमतेत टप्प्या टप्प्याने वाढ होईल.
एकूण दहा हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात टप्प्याटप्प्याने होईल.
8 हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. तर अनेक पटींनी जास्त अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
100 मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प कारखान्याला अखंडित वीज पुरवठा करेल.
प्रामुख्याने आयरन स्पोंज हे या कारखान्यातून तयार केले जाईल. त्यासाठी सुरजागड टेकड्या वरील खाणीतून निघणाऱ्या लोह खनिज या कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरला जाईल.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)