एक्स्प्लोर
आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नसतं : यशवंत सिन्हा
आता राजशक्तीविरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अकोला : सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात. मात्र आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नसतं, असा थेट घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. ते अकोल्यात बोलत होते.
शेतकरी जागर मंचानं अकोल्यात व्याख्यान आयोजित केले होते. तिथे यशवंत सिन्हा यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटबंदी, जीएसटी आणि भारतीय शेतकरी’ या विषयावर मत मांडलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला.
आपल्या भाषणाची सुरुवातच यशवंत सिन्हांनी मोदींना टोमणा मारुन केली. यशवंत सिन्हा म्हणाले, “मी ‘मित्रों’ म्हणणार नाहीय.”. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला
नोटाबंदी पूर्णपणे अपयशी : सिन्हा
नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जात आहेत. आपण लोकांना भुलवत ठेवत सरकार चालवत आहोत, अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
“आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही. त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरुप महत्वाचं आहे. जीएसटीमध्ये दिलेल्या सवलती दिशाभूल करणाऱ्या आहेत. यावेळी या विसंगती लवकर दूर न केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.”, असेही सिन्हा म्हणाले.
जीएसटीवर निशाणा
जीएसटी म्हणजे गुड अॅंन्ड सिम्पल टॅक्स नाही, तर आता एवढा जटील केला आहे की बॅड अॅन्ड काँप्लिकेटेड टॅक्स झाला आहे, असे म्हणत त्यांनी जीएसटीवरही निशाणा साधला.
आता राजशक्तीविरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
जेटलींना प्रत्युत्तर
आपल्या वयावर बोलणाऱ्यांबद्दल बोलताना, संघर्ष करायला वयाची कोणतीच सीमा नसतात, असं म्हणत यशवंत सिन्हांनी जेटलींना टोला लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement