एक्स्प्लोर
बीड जिल्ह्यात शासकीय गोडाऊनला भीषण आग, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला संपूर्ण माल नष्ट
जिल्ह्यातील गेवराई शहरातील शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्यानं तब्बल वीस कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. अकरा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दुपारी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक यंत्रणेला यश आलं आहे.
बीड : जिल्ह्यातील गेवराई शहरातील शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्यानं तब्बल वीस कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. अकरा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दुपारी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक यंत्रणेला यश आलं आहे.
गेवराई शहरातील शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनला रविवारी रात्री आग लागली होती. या आगीत कापसाचे गठाण, तूर आणि सोयाबीन याचे नुकसान झाले आहे. अकरा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
गेवराईत शासकीय वखार महामंडळाचे चार गोडाऊन आहेत. यामध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल ठेवलेला होता. मध्यरात्री अचानक एका गोडाऊनला आग लागली. आग एवढी भीषण होती की यातील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कशी लागली याच कारण समजू शकले नाही.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement