एक्स्प्लोर

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची बाजी, 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल जाहीर

राज्याल्या सर्वात अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग जिथे नेटवर्कची समस्या सर्वाधिक बिकट आहे. अशा गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील विद्यापीठाने एवढ्या कमी कालावधीत ऑनलाईन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणे ही कौतुकास्पद बाब आहे.

गडचिरोली : गडचिरोली म्हटलं तर डोळ्यासमोर आदिवासी विकासापासून कोसो दूर असलेला नक्षल्याचा गड दिसतो. मात्र ह्याच गडचिरोली जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षेत गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने बाजी मारली आहे. विद्यापीठाचे 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल यशस्वीपणे जाहीर करण्यात आले आहेत.

गडचिरोलीत जिथे नीट रस्ते नाही, अनेक गावांत आजही लाईन पोहोचलेली नाही. संपूर्ण भाग नक्षल्यांच्या दहशतीत जगणारा. मात्र मेट्रो सिटीच्या तुलनेने याच गडचिरोलीने शैक्षणिक क्षेत्रात बाजी मारली आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. याचा फटका तत्पूर्वी 5 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा होणार होती. मात्र पहिल्याच पेपरला इंटरनेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पहिला पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती.

मात्र दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने बाजी मारत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा आठ दिवसांमध्ये आटोपून दोन दिवसात 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी सायंकाळी जाहीर केले. राज्याल्या सर्वात अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग जिथे नेटवर्कची समस्या सर्वाधिक बिकट आहे. अशा गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील विद्यापीठाने एवढ्या कमी कालावधीत ऑनलाईन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणे ही कौतुकास्पद बाब आहे.

गोंडवाना विद्यापीठातर्फे 12 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात झाली. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील संलग्न असलेल्या 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. अतिदुर्गम भागात इंटरनेट सेवेचा अभाव असतानाही गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने सर्व पेपर यशस्वीरित्या घेतले. तत्पूर्वी 5 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा होणार होती. मात्र पहिल्याच पेपरला इंटरनेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पहिला पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती.

नव्या वेळापत्रकानुसार 12 ऑक्टोंबरपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित केली होती. परीक्षेसाठी पात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी 95.93 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर 4.7 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान 96 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या योग्य नियोजनामुळे ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडली. यानंतर दोन दिवसात निकाल जाहीर करण्यात आले आणि यात ते यशस्वी ठरल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget