पाचव्या Genome Sequencing चाचणीचे निष्कर्ष जाहीर
कोविड लसीकरण (Covid Vaccination) वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई : कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत पाचव्या चाचणीचे (जिनोम सिक्वेंसिंगचे) निष्कर्ष जाहीर झाले आहे. एकूण 221 नमुन्यांमध्ये 'डेल्टा व्हेरियंट' चे 11 टक्के, 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' चे 89 टक्के रुग्ण तर ओमायक्रॉनचे २ रुग्ण सापडले आहे. लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे. चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ओमायक्रॉन (Omicron) विषाणुचे रुग्ण हे संकलित नमुन्यांच्या संख्येत एक टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. संकलित केलेल्या 221 पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. चाचणीचे निष्कर्ष पाहता कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईतील 221 रुग्णांपैकी 19 रुग्ण ( 9 टक्के) हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 69 रुग्ण (31 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 73 रूग्ण (33 टक्के), 61 ते 80 वयोगटात 54 रुग्ण (25 टक्के) आणि 61 ते 100 वयोगटातील 6 रुग्ण ( 3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.
दोन ओमायक्रॉन बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची देखील कोविड चाचणी केली असता त्यातही कोणालाही कोविड बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास या 221 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या 26 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या 47 पैकी 12 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या 221 पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे.
एकूण 221 रुग्णांपैकी वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये 13 जण मोडतात. त्यापैकी दोन जणांना 'डेल्टा व्हेरियंट' आणि 11 जणांना डेल्टा डेरिव्हेटीव्ह' प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :