Twitter Trends 2021 : मोदींचा लस घेतानाचा फोटो सर्वाधिक रीट्वीट तर टीम इंडियाच्या अभिनंदनाचं ट्वीट सर्वाधिक लाईक
Top Tweets in Government : या वर्षी सरकारकडून करण्यात आलेल्या कोणत्या ट्वीटला सर्वाधिक रीट्वीट करण्यात आलं आहे आणि सर्वाधिक लाईक करण्यात आलं आहे याची माहिती देण्यात आली आहे.
Top Tweets in Government : वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने झाली तर आता वर्ष संपताना ही लाट आटोक्यात आल्याचं दिसतंय. या काळात ऑक्सिजनच्या अभावी देशातील नागरिकांना अनेक अडचणींनी सामोरं जावं लागलं. तसेच पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लसीकरणाची गती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात देशातील नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी म्हणून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतली आणि त्याचा फोटो ट्वीट केला. सरकारकडून शेअर करण्यात आलेल्या या ट्वीटला सर्वाधिक रीट्वीट मिळाले आहेत. तर गाबा कसोटी जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं अभिनंद केलं होतं. त्या ट्वीटला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत.
ट्विटरने या वर्षी सर्वाधिक रीट्वीट झालेल्या आणि सर्वाधिक लाईक करण्यात आलेल्या ट्वीट्सची माहिती दिली आहे. #OnlyOnTwitter या नावाने त्यांनी ही माहिती प्रकाशित केली आहे.
सरकारचे सर्वाधिक रीट्वीट झालेले ट्वीट
या वर्षी मार्च महिन्याच्या 1 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये देशातल्या डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचार्यानी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
सरकारचे सर्वाधिक लाईक झालेले ट्वीट
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात गाबा टेस्टमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचे ट्वीट करुन अभिनंदन केलं होतं. त्यांनी केलेलं हे ट्वीट सर्वाधिक लाईक करण्यात आलं आहे. हे ट्वीट 19 जानेवारीचं आहे.
We are all overjoyed at the success of the Indian Cricket Team in Australia. Their remarkable energy and passion was visible throughout. So was their stellar intent, remarkable grit and determination. Congratulations to the team! Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2021
संबंधित बातम्या :
- Twitter Trends 2021 : 'हे' हॅशटॅग ठरले सर्वाधिक ट्रेंडिग
- Golden Tweets of 2021 : नेटकऱ्यांनी 2021 मध्ये कोणत्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट आणि लाईक्स केलं...