एक्स्प्लोर

सलाम...! सासू-सासर्‍यांनी केले सुनेचे कन्यादान, अनोख्या विवाहाची बुलडाणा जिल्ह्यात चर्चा

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका अनोख्या विवाहाची सध्या चर्चा सुरु आहे. सुनगावमध्ये सासू-सासऱ्याने आपल्या सुनेचं कन्यादान करत एक नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका अनोख्या विवाहाची सध्या चर्चा सुरु आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावमध्ये एका सासू-सासऱ्याने आपल्या सुनेचं कन्यादान करत एक नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे. सुनगावमधील शालिग्राम वानखडे यांनी आपल्या सुनेचे कन्यादान करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाशी 16 मार्च 2020 रोजी धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा उमाळे या तरुणीसोबत विवाह झाला होता. परंतु दुर्दैवाने काही महिन्यातच 31ऑगस्ट 2020 रोजी संतोष शालिग्राम वानखडे याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे राधा ही आपले सासू सासऱ्यांकडेच राहत होती.

सासरे शालिग्राम वानखडे व सासू वत्सलाबाई यांनी राधा हिचा आपल्या मुलीप्रमाणे सात ते आठ महिने सांभाळ केला. त्यानंतर काल राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार यांच्याशी सुनगाव येथे नोंदणी पद्धतीने विवाह करून दिला. अशा प्रकारचा विवाह म्हणजेच सासू-सासरे यांनी केलेले सुनेचे कन्यादान करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे, अशा शब्दात वानखडे दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. या विवाहासाठी राधाचे सासरे शालिग्राम यांनी सात ते आठ महिन्यांपासून प्रयत्न केला.

या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह सुनगाव येथे पार पडला. अशा या आगळ्यावेगळ्या विवाहाची समाजातील प्रत्येकाने खरोखर प्रेरणा घ्यायला हवी. या अनोख्या विवाहाची जिल्हाभर चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget