एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तलासरीत चॉकलेटच्या आमिषाने फादरकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
तलासरी (पालघर) : आदिवासी शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संचालक फादर जेकब दिब्रिटो आणि फादर वेल्डन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेल्डनला अटक केली असून जेकब दिब्रिटो फरार असल्याची माहिती मिळते आहे.
चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप वेल्डन आणि दिब्रिटोवर लावण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून महिला दक्षता समितीने अहवाल सादर केल्यानंतर, दोन्ही आरोपांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महिला दक्षता समितीनं वर्षभरापूर्वी अहवाल तयार करूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचं समोर येतं आहे.
शाळेत घडलेला प्रकार खूप गंभीर आणि निंदनीय असल्याच मत व्यक्त करुन, महिला कमिटी स्थापन करुन अशा किती घटना या शाळेत या फादराने केल्या असतील याची चौकशीची करुन, कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement