एक्स्प्लोर
Advertisement
खा. दिलीप गांधी आणि मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल
गांधी पिता-पुत्रांसह चौघांची सीआयडी चौकशी केली जाणार आहे.
अहमदनगर : अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.
हायकोर्टाच्या खंडपीठाने नगरच्या शोरुम मालकाच्या याचिकेवर आदेश दिले आहेत. या प्रकरणी फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर अपहरण, खंडणी आणि कट रचल्याप्रकरणी भूषण बिहाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण बिहाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
काय आहे प्रकरण?
2014 साली खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून इन्डेवर कार खरेदी केली होती. मात्र यानंतर गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात गाडीच्या परफॉर्मन्स बाबत तक्रार केली. या प्रकरणी जून 2015 साली सुवेंद्र गांधींनी सहकाऱ्यांच्या मदतीने शोरुमधील मॅनेजरचं अपहरण केलं. त्याचबरोबर मारहाण करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. तर खासदार दिलीप गांधी यांनी खासदार पदाचा वापर करुन माझ्याबाबत मंत्री आणि आयकर विभागाला तक्रार केल्याची बिहाणी यांची याचिका आहे.
नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली, मात्र काहीच आढळून न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे बिहाणी यांनी न्यायालयात धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणी सबंधितांवर 24 तासात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
दुसरीकडे खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचं रस्त्यावर अतिक्रमण आहे. या प्रकरणी औरंगाबाद न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून बंगल्याची मोजणी करण्यात आली. लवकरच यावर निर्णय होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement