एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकणार
मुंबई : राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्तही ठरला होता. मात्र, आता हा मुहूर्त हुकणार आहे.
कॅबिनेट बैठकीत प्लास्टिक बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पण ही प्लास्टिक बंदी आता टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. उद्या (शुक्रवार) सभागृहात याविषयी निवेदनही करण्यात येणार आहे.
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी एक्सपर्ट कमिटी आणि एमपॉवर्ड कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या, ताटं, चमचे, टोप्या यावर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, पाण्याच्या बाटल्यांवर तूर्तास बंदी घालण्यात आलेली नाही. पण मिनरल वॉटप कंपन्यांच्या लॉबीचा सरकारवर दबाव असल्याने तूर्तास PET बॉटल्सवरचा बंदीचा निर्णय पुढे ढकलल्याची सध्या चर्चा आहे.
प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्या अशा दोघांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद असेल.
संबंधित बातम्या :
राज्यात लवकरच प्लास्टिक बंदी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement