एक्स्प्लोर

एकविरा देवी मंदिराचा कळस शोधण्यासाठी पोलिसांना 15 दिवसांचं अल्टिमेटम

लोणावळ्याजवळच्या कार्लामधील एकविरा देवी मंदिराचे कळस शोधण्यासाठी मंदिर समितीने पोलिसांना पंधरा दिवसाची मुदत दिली आहे.

लोणावळा : लोणावळ्याजवळच्या कार्लामधील एकविरा देवी मंदिराचे कळस शोधण्यासाठी मंदिर समितीने पोलिसांना पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. 15 दिवसात कळस शोधण्यात पोलिसांना अपयश आल्यास दुसरा कळस बसविण्यात येईल, असा इशारा ही राज्य सरकारला मंदिर समितीकडून देण्यात आला आहे. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांना कळस देण्यासाठी समितीने एकमुखाने संमती दिली आहे. 3 ऑक्टोबरच्या पहाटे अवघ्या चार मिनिटांत चोरटयांनी हा कळस चोरला होता. पोलिस, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही तैनात असताना ही चोरी झाल्याने पोलिस आणि मंदिर समितीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र मंदिर समिती सुरक्षेच्या दृष्टीने कुठेच कमी पडली नसून केवळ पोलिसांची निष्क्रियता चोरीला कारणीभूत ठरल्याचा दावा मंदिर समितीनं केला आहे. दरम्यान कळसाच्या चोरीनंतर मंदिर समिती सुरक्षेच्या दृष्ठीने नवीन पावलं उचलली आहेत. - रात्री आठ नंतर पोलिस आणि सुरक्षा रक्षकाविना मंदिर परिसरात कोणाला सोडलं जाणार नाही. - रात्री मंदिरात प्रवेश बंद केल्यानंतर लेणी विभागाचे गेट ही बंद केले जाणार. - नियुक्तीपूर्वीच सुरक्षा रक्षकांचे पोलिस व्हेरिफिकेशन घेतले जाणार. - अंतर्गत सुरक्षेत वाढ करणार. - सीसीटीव्ही वाढवले जाणार. - ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पार्किंग जवळ गेट बसवले जाईल. मंदिर समितीकडून पत्रकारांना पैसेवाटप दरम्यान लोणावळ्याच्या कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेल्यानंतर आता मंदिर समितीने तर त्याहून मोठा कळस गाठला आहे. आठवड्याभरानंतरही चोरटे सापडत नसल्यानं सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी समितीने पत्रकार परिषद घेतली. मात्र सरकार आणि पोलिसांसोबतच मंदिर समितीच्या सुरक्षा यंत्रणेवर ही प्रश्न उपस्थित होत आहेत. याची माध्यमांमधून आणखी वाच्यता होऊ नये, म्हणून थेट पत्रकारांना पैसे वाटले जात होते. पत्रकार लांबून आलेत तर जेवण आणि येण्या-जाण्याचा खर्च म्हणून पैसे घ्या असा आग्रह मंदिर समितीचे खजिनदार नवनाथ देशमुख यांनी धरला. साहेबांनी सांगितले आहे सर्वांना स्वखुशीने पैसे द्या. हे साहेब म्हणजे मंदिर समितीचे अध्यक्ष अनंत तरे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget