Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना 7 दिवसात 10 धक्के
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv sena : गेल्या आठवड्याभरात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सात दिवसात तब्बल दहा धक्के दिले आहेत..
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv sena : गेल्या आठवड्याभरात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सात दिवसात तब्बल दहा धक्के दिले आहेत... सरकार घालवण्यापासून ते अनेक निर्णय रद्द करण्यापर्यंत तब्बल दहा धक्के शिंदेंकडून देण्यात आलेत... याशिवाय अनेक ठिकाणचे नगरसेवकही आता शिंदे गटासोबत जाऊ लागल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिवसेंदिवस धक्के बसू लागलेत... आगामी काळात पालिका निवडणुका आहेत... आणि या पालिका निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे अनेक धक्के शिंदे गट देऊ शकतो.... आपण ज्या चक्रव्युहात अडकलोय तो चक्रव्युह फक्त ४० आमदारांच्या बंडखोरीपुरता मर्यादीत नाहीय, याची प्रचिती आतापर्यंत उद्धव ठाकरेंना आलीच असेल..
शिंदेंचे ठाकरेंना 7 दिवसात 10 धक्के
शिंदे-फडणवीस सरकार, 40 आमदार फोडले
विधिमंडळात प्रतोद आणि गटनेतेपदी शिंदे गटाची वर्णी
मेट्रोचं कारशेड कांजूरऐवजी आरेमध्येच होणार
जलयुक्त शिवार योजना सुरु करण्याची तयारी
नाशिक जिल्ह्याचा ५६८ कोटींचा निधी थांबवला
जिल्हा नियोजन समितीचा १३ हजार कोटींच्या निधीला स्थगिती
मविआच्या काळातील शेवटच्या तीन बदल्यांना स्थगिती
ठाणे पालिकेतील ६६ नगरसेवक शिंदे गटात
नवी मुंबई पालिकेतील ३३ नगरसेवक शिंदे गटात
मुंबईतील मागाठाणे येथील शाखाप्रमुखांचे राजीनामे
ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो, मात्र तो शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे हे तिथल्या नगरसेवकांनी रातोरात दाखवून दिलं आहे. ठाणे महापालिकेतल्या शिवसेनेच्या 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवक एकनाथ शिंदेंना जाऊन मिळालेत. अपवाद हा फक्त खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी राजन विचारे यांचा.. ठाणे महापालिकेतल्या बंडखोरीची प्रवृत्ती एमएमआरएतील इतर महापालिकांमध्ये देखील पाहायला मिळू शकते हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. ठाण्यानंतर नवी मुंबईतही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं कळतंय. नवी मुंबईत शिवसेनेचे ३८ नगरसेवक आहेत. त्यापैकी ३० ते ३५ नगरसेवक शिंदे गटाला समर्थन जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. ज्यात विजय चौगुले, किशोर पाटकर, शिवराम पाटील, नवीन गवते आणि सुरेश कुलकर्णी या मोठा नावांचा समावेश आहे.