Eknath Shinde : मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा रहमान डकैत कोण? आम्ही त्यांना पाणी पाजणारे 'धुरंधर'; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही. यांनी कितीही आदळाआपट केली तरी मी माझं काम सुरूच ठेवणार असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. कोविड असो वा मिठी नदी, प्रत्येक ठिकाणी यांनी दरोडा घातला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत आहेत, तर आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर आहोत असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे बोलत होते.
मुंबईची तिजोरी लुटणाऱ्या असल्या रहमान डकैताना पाणी पाजणारी 'धुरंधर' महायुती आहे. इलाका किसी का भी हो, धमाका महायुती करेगा. 'हमारी सारी योजना हैं गेम चेंजर, कॉर्पोरेशन का इलेक्शन जित कर हम ही होंगे धुरंधर' अशी शायरीतून टोलेबाजी शिंदेंनी केली.
Eknath Shinde On Uddhav Thackeray : मी कामावर बोलणारा नेता
एकनाथ शिंदे म्हणाले की, "माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि उपमुख्यमंत्री आहे तर आताही मला घटनाबाह्य म्हणतात. महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा उपमुख्यमंत्री होतेच ना? कितीही म्हटलं, आदळआपट केली तरी माझं काम चालूच आहे. सर्वसामान्य घरातील व्यक्ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाला म्हणून ही जळजळ आहे. 'न मैं गिरा न मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने वाले कई बार गिरे'."
समुद्रात यापुढे काळे पाणी जाणार नाही. मुंबईतील राजकीय प्रदूषणही दूर करू. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडला मान्यता मिळाली आहे. मुंबईत पॉड टॅक्सी देखील होणार आहे. बिकेसी ते नवी मुंबई विमानतळ भुयारी भोगदा करतोय. विरार ते वाढवणपर्यंत आपण रस्ते करतोय अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
Eknath Shinde On Mumbai : मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाही
मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकराला परत आणण्याचे काम आम्ही करू. सूर्य चंद्र आले, कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. झोपडी धारकांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम करतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनी 23 जानेवारी निमित्त योजना पुष्प अर्पण करणार आहोत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र आम्ही लावले. मी मुख्यमंत्री झाल्यावर आयुक्तांना बोलवून निर्णय घेतला आणि आपण 300 एकरचे सेंट्रल पार्क आज करतोय. पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी आम्ही राज्यातील सर्व शहरांतील गार्डनसाठी पैसे दिले."
Eknath Shinde Mumbai Speech : सत्तेसाठी काम करत नाही
आम्ही खुर्चीसाठी काम करत नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच होतो, आता ही तसाच आहे. लोक मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन अर्थात DCM म्हणतात. मी कुठेही गेलो तरी अनेकांना प्रॉब्लेम आहे. मी टीकेला टीकेने नाही तर कामाने उत्तर देतो. मी आरोपांना सभ्य भाषेत उत्तर देतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde On Farmers : कर्जमाफी होणारच
एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची मदत दिली. निकष, नियम बदलून शेतकऱ्यांना मदत केली. त्यावर आता काहीजण कर्जमाफीचं विचारलं जातंय. पण आम्ही शब्द दिला आहे, कर्जमाफी होणारच. काही जण बांधावर गेले, फोटो काढून आले. पण आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच. सत्तेत येण्यापूर्वी दिलेला शब्द पाळणार, प्रिंटिंग मिस्टक म्हणणार नाही."
तुम्ही म्हणाला होता लाडकी बहीण योजना बंद होईल, पण अजूनही सुरू आहे. जे कोर्टात गेले ते, हरले. कोणी 'माई का लाल' आला तरी लाडक्या बहिणीची ओवाळणी बंद होणार नाही. त्यांना 2100 रुपये देणार म्हटलं तर देणारच असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
ही बातमी वाचा:
























