एक्स्प्लोर

Hasan Mushrif ED Raids : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची छापेमारी; साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी छापे

Hasan Mushrif ED Raids : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आङे. सकाळी 6 वाजल्यापासून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे.

Hasan Mushrif : माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून (ED) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी एबीपी माझाकडे पुष्टी केली आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सध्या आपण घरी नसल्याची एबीपी माझाला माहिती त्यांनी दिली आहे. 

हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.  सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
मुश्रीफ आणि  प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची  माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत.

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी

जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget