1826 पानांचे पुरावे देऊनही अब्दुल सत्तारांवर कारवाई होईना, तक्रारदराने थेट ईडी कार्यालयासमोरच कापला केक
Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.

मुंबई : मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या विरोधात दोन वर्षात तीनदा तब्बल 1826 पानांचे पुरावे देऊन तक्रारी दाखल केल्या. मात्र, तरीही ईडी (ED) कार्यालयाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने तक्रारदराने चक्क ईडी कार्यालयासमोरच दोन वर्षाचा केक कापत 'तक्रार दिन' साजरा केला आहे. तसेच, आत्ताही कारवाई न झाल्यास आता थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा तक्रारदराने दिला आहे. महेश शंकरपल्ली (Mahesh Shankarpalli) असे तक्रारदर यांचे नाव असून, ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते आहेत.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले आहेत. त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या असून, मोठे घोटाळे देखील केले असल्याचा आरोप सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सोबतच त्यांनी आपल्याकडे सत्तार यांच्या कारनाम्याचे पुरावे असल्याचे देखील म्हणाले होते. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शंकरपल्ली यांनी पहिल्यांदा 31 डिसेंबर 2021 रोजी 784 पानाची तक्रार ईडी कार्यालयात दाखल केली होती. मात्र, कोणतेही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा 01 जानेवारी 2023 रोजी 569 पानाची तक्रार ईडी कार्यालयात दिली. मात्र, तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महेश शंकरपल्ली यांनी ईडी कार्यालयात 473 पानाची तक्रार दिली आहे. तसेच, पुढील एका महिन्यात ईडीने तक्रारीची दखल न घेतल्यास आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे महेश शंकरपल्ली यांनी म्हटले आहे.
केक कापून तक्रार दिन साजरा केला...
महेश शंकरपल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. सत्तार यांनी आपल्या पदाचा वापर करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे सत्तार यांच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तसेच, तेव्हापासून आतापर्यंत तीनदा महेश शंकरपल्ली यांनी एकूण 1826 पानांचे पुरावे जोडत सत्तार यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली आहे. मात्र, तरीही कारवाई होत नसल्याने ईडी विरोधात हटके आंदोलन करत महेश शंकरपल्ली यांनी आज ईडी कार्यालयाच्या समोर केक कापत तक्रार दिन साजरा केला आहे. सोबतच महिन्याभरात कारवाई न झाल्यास थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी दिला आहे.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
