एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अण्णांच्या आदर्श गावालाही दुष्काळाचा फटका, राळेगणसिद्धीमध्ये टँकर
अहमदनगर : महाराष्ट्रातील या भीषण दुष्काळात जलसंधारणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ज्या दोन गावांचा नेहमीच दाखला दिला जातो, त्यापैकी एक असलेलं राळेगणसिद्धी टँकरग्रस्त झालं आहे. होय, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावाला सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
राळेगणमध्ये दररोज तीन टँकरने पिण्याचं पाणी पुरवावं लागत आहे.
गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. एका अर्थाने सध्याचा दुष्काळ किती भीषण आहे, हे ही यावरुन स्पष्ट होत आहे.
राळेगणसिद्धीतील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटत चालले आहेत. जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामासाठी राळेगणसिद्धी हे एकेकाळी आदर्श गाव होतं. आजही जलसंधारणाच्या आदर्श कामासाठी अण्णांच्या राळेगण आणि पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारचा उल्लेख केला जातो.
गावपातळीवरील जलसंधारणाचे प्रणेते म्हणून राज्यभर ज्यांचा गौरव झाला त्या अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धीतील पाण्याच्या दुर्भिक्ष्य दुष्काळाची आणि पाण्याच्या अनिर्बंध उपशाची कहाणी सांगून जातं. पण राळेगणवासियाचं नेमकं चुकलं कुठे याचा पडताळा घेण्याचं काम अण्णांनी सुरु केलं आहे.
राळेगणसिद्धीला टँकरग्रस्त करण्यासाठी जबाबदार आहेत, त्या राळेगणमधल्या बोअरवेल्स. एकट्या राळेगणमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त बोअरवेल्स आहेत. या बोअरवेल्सने संरक्षित पाण्याचा अमाप उपसा केला आणि आज ऐन दुष्काळात राळेगणला पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे.
50 च्या दशकात राळेगण परिसरात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. त्यानंतर 1975 पासून पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणाच्या कामाला वेग आला. त्यामुळे पाणीटंचाई दूर झाली. पाण्याच्या बाबतीत गाव स्वावलंबी झालं. फक्त स्वावलंबीच नाही तर अन्य कितीतरी गावांसाठी आदर्शही झालं.
जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासाचं काम पूर्ण झाल्यावर अण्णांनी भ्रष्टाचाराकडे आपला मोर्चा वळवला. तेव्हा गावातल्या लोकांनी जास्तीच्या पाण्यासाठी बोअरवेल्सचा आसरा घेतला आणि मग सुरु झाला पाण्याचा बेबंद उपसा.
आता अण्णांनी पुन्हा कंबर कसली आहे. अण्णा हजारेंनी राळेगणमधल्या सर्व 300 बोअरवेल्स बुजवण्याचा ठराव ग्रामसभेत संमत करुन घेतला आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व बोअरवेल्स बुजवल्या जातील.
त्यापैकी काही बोअरवेल्स सिमेंट क्राँकिटने बुजवण्याचं काम सुरुही झालं आहे. 2017 पर्यंत म्हणजे पुढील वर्षी पुन्हा राळेगणमध्ये पाण्याचा सुकाळ असेल, असा विश्वास अण्णांना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement