एक्स्प्लोर
वाहनाला जागा न दिल्याने परभणीत भरदिवसा डॉक्टरकडून गोळीबार
गोळीबार करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
परभणी : रस्त्यावरून जात असताना वाहनाला साईड न दिल्याने झालेल्या भांडणात परभणीत गोळीबाराची घटना घडली. शहरातील डॉक्टरने केलेल्या या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
गोळीबार करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील गव्हाणे चौकात हा प्रकार घडला. रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान शहरातील डॉक्टर प्रसाद मगर हे आपली चार चाकी घेऊन जात होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या सावंत बंधू (विश्वधर आणि रामचंद्र ) आणि त्यांच्यात वाहनाला रास्ता न दिल्याने भांडणाला सुरुवात झाली. सावंत बंधू आणि डॉक्टर मगर यांच्यात हाणामारीही झाली.
या भांडणानंतर डॉक्टर मगर यांनी आपल्या जवळील बंदुकीने हवेत गोळीबार केला. दुसरी गोळी जमिनीवर मारली. ज्यातून विश्वधर सावंत हे जखमी झाले. त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement