एक्स्प्लोर

“वेळप्रसंगी हमाली करा, पण शिक्षक होऊ नका”

2003 सालापासून कोल्हापूर विभागातील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या 428 शिक्षकांची पदे शासन निर्णयाने व्यपगत अर्थात रद्द करण्यात आली आहेत.

कोल्हापूर : रिक्त असलेल्या पदांवर गेली 12 ते 18 वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांच्या पदांना शिक्षण विभागाने रद्द केल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वेळप्रसंगी हमाली करा, पण शिक्षक होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं. कोल्हापुरात आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने बोलावलेल्या सभेत शिक्षक आमदारांपुढेच महिला शिक्षिकांनी रडत आपली गाऱ्हाणी मांडली, तर काही महिला शिक्षिका रडतच या सभेतून बाहेर पडल्या. या सभेत जमलले बहुतांश शिक्षक हे गेली 12 ते 18 वर्षे महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. मात्र शासनाने यांची पदे रद्द केल्याने त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचं हे शिक्षक सांगतात. तर काही शिक्षकांना रडूही आवरता येत नाही. मुलांनी हमाली करावी, पण शिक्षक होऊ नये असं मतही ते व्यक्त करतात. 2003 सालापासून कोल्हापूर विभागातील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या 428 शिक्षकांची पदे शासन निर्णयाने व्यपगत अर्थात रद्द करण्यात आली आहेत. या संस्थांमध्ये त्या त्या वेळी पदे भरताना उमेदवार न मिळाल्याने संस्था चालकांनी शासानाची मान्यता घेऊन या शिक्षकांची नेमणूक केली होती. आता तब्बल 15 वर्षानी शिक्षण विभागाने या शिक्षकांची पदे रद्द केली आहेत. आज कोल्हापुरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने बोलावलेल्या सभेत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या समोर या शिक्षकांनी आपली गाऱ्हाणी मांडली. यावेळी एका शिक्षिकेचा रक्तदाब वाढला, तर काही शिक्षिकांना रडू कोसळलं. आता आम्ही काय करणार, आमचं घर कसं चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यामुळे काही काळ सभेत गंभीर वातावरण तयार झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Maharashtra Live News Updates: पाण्यानंतर आता मराठवाड्यात रक्ताचा तुटवडा
Maharashtra Live News Updates: पाण्यानंतर आता मराठवाड्यात रक्ताचा तुटवडा
Parinay Fuke: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही सक्तीची वसुली सुरूच; आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप; मायक्रो फायनान्स अन् बँकांना थेट इशारा, म्हणाले, आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही सक्तीची वसुली सुरूच; आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप; मायक्रो फायनान्स अन् बँकांना थेट इशारा, म्हणाले, आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Embed widget