एक्स्प्लोर

'मार्ड' आंदोलनावर ठाम, डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता

मुंबई: मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केला असला तरीही मार्ड मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन आता जास्त चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टरही रत्नागिरी आणि अकोल्यात संपावर जाणार आहेत. अकोल्यातील तब्बल 600 डॉक्टर संपावर गेले आहेत. तर रत्नागिरीतील आज (22 मार्च) रात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेताल आहे. यावेळी आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली जाईल मात्र, इतर कोणत्याही रुग्णाची तपासणी केली जाणार नाही. त्याचप्रमाणे उद्याच्या नियोजित शस्त्रक्रियाही रद्द करण्यात आल्या आहेत. एकीकडे गिरीश महाजन यांनी संप मागे घेतल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे आता सरकार आणि मार्डमधील तिढा आणखी वाढला आहे. ‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला असून आज (22 मार्च) रात्री 8 वाजता डॉक्टर कामावर रुजू होणार असल्याचं आश्वासन ‘मार्ड’नं मला दिलं आहे.’ असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आज माझ्याशी याबाबत चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्याही त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्यांच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या आहेत. त्यांची सुरक्षेविषयीची प्रमुख मागणी आणि इतर मागण्याही आम्ही मान्य केल्या आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आपण संप मागे घेत असल्याचं मला सांगितलं.’ अशी माहिती महाजन यांनी दिली होती. ‘जर डॉक्टर कामावर रुजू झाले नाही तर मात्र, त्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.’ असं महाजन म्हणाले होते. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. काय आहे प्रकरण? सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे. आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे. मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय? – डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा – डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी – निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा – सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा संबंधित बातम्या: ‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’, गिरीश महाजन यांचा दावा आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार  नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Embed widget