कोकणात निसर्गाचा आविष्कार, पावसात कोरडी अन् उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहणारी तळी गोळवण गावात
निसर्गाने कोकणाला भरभरून निसर्ग सौंदर्य आणि अनेक गूढ दिली आहेत. गोळवण गावात एक अशी तळी आहे, ज्या तळी उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहतात तर पावसाळ्यात तळ गाठते.
रत्नागिरी : महाराष्ट्रातील काही भागात एकीकडे पाणी प्रश्न भीषण असताना मान्सूनचं आगमन पण लांबल आहे. असं असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील गोळवण गावात एक अशी तळी आहे. या तळीत मे महिना संपून जून महिना लागला असतानाही तुडुंब भरून पाणी वाहत आहे. पावसाचा पत्ता नसतानाही निसर्गाच्या कृपा आशिर्वादाने ही तळी भरून वाहत आहे. ज्या तळीत कडाक्याच्या उन्हाळ्यात तुडुंब भरून पाणी वाहत तर पावसाळ्यात तळी कोरडी होते. पांडवकालीन ही तळी असल्याचा स्थानीक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आपण पावसाळ्यात ओसंडून भरून वाहणाऱ्या आणि उन्हाळ्यात साफ कोरड्या पडणाऱ्या नद्या, नाले, तळी, विहिरी पाहतो. मात्र कडक उन्हाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या आणि पावसात तळ गाठणारी तळी आपण कधी पाहिलेत का? निश्चितच नाही ना. मग आज आम्ही तुम्हाला सिंधुदुर्गातील मालवण मधील निसर्गाचा कृपाशीर्वाद लाभलेल्या गोळवण गावातील तळ्याविषयी माहिती देणार आहे.
निसर्गाने कोकणाला भरभरून निसर्ग सौंदर्य आणि अनेक गूढ दिली आहेत. गोळवण गावात एक अशी तळी आहे, ज्या तळी उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहतात तर पावसाळ्यात तळ गाठते. विशेष म्हणजे आजूबाजूच्या विहिरी, नद्या, नाले अक्षरश: कोरडे पडलेले असताना देखील या तळीत उन्हाळयात तुडुंब भरून वाहत आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून या तळीचा विकास व्हावा आणि पर्यटकांना निसर्गाचा हा अविश्वास पहायला यावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या छोट्या तळीतील पाणी आजूबाजूचे गावकरी वापरता तसेच जनावरांसाठी वापरलं जातं. विशेष म्हणजे ही छोटी तळी ओसंडून वाहत असली तरी त्या पाण्यावर शेती केली जात नाही. गावकऱ्यांचा असा समज आहे की या पाण्याच्या माध्यमातून शेती केल्यास पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे आजूबाजूला कोणत्याही प्रकारची शेती केली जात नाही. आजूबाजूला ओहोळ, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या असल्या तरी देखील ही छोटीशी तळी मात्र ओसंडून वाहत आहे.
पांडवांनी याठिकाणी एक रात्र मुक्काम करून पाण्याच्या शोधात असताना याठिकाणी बाण मारून ही छोटीशी तळी निर्माण केल्याची आख्यायिका स्थानिक ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे या तळीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवावा आणि पर्यटनाच्या दृष्टीने करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :