एक्स्प्लोर
पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे
मुंबई/बीड: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये तडीपारीबद्दल जे बोलल्या ते खरं आहे, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
भगवानगड, पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्या वादाबाबत धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. पंकजा मुंडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, एबीपी माझाने त्यांच्या प्रतिक्रियेसाठी धनंजय मुंडेंशी संपर्क साधला. त्यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास धनंजय मुंडेंनी ही एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
तडीपारी प्रकरणाची चौकशी करा
बीड-परळी भागातून आजपर्यंत ज्यांना-ज्यांना तडीपार केलं आहे, त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकलेल्या आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. तसंच कायदेभंगाची भाषा करणाऱ्या पंकजा मुंडेंकडून राजीनामा घ्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
"लोकांना मारुन, त्यांच्याचविरोधात केस करुन, त्यांनाच तडीपार करतो आम्ही,..आम्ही पण साधे नाहीत", असं पंकजा मुंडे ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाल्या होत्या.
तोच धागा पकडून धनंजय मुंडे यांनी बीड,परळी भागातील तडीपार केलेल्या खटल्याची कागदपत्रं सादर केली.
संघर्ष टळायला हवा
भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही असा ठराव कऱण्यात आला आहे. भाषण व्हावं की नाही, पंकजा आणि नामदेवशास्त्री यांच्या वादात मी पडणार नाही. तो अधिकार मला नाही. मात्र संघर्ष टळायला हवा, असं धनंजय मुंडे म्हणाले.
मी भगवानबाबांचा निस्सिम भक्त
भगवानबाबांचा मी निस्सिम भक्त आहे. मलाही भगवान गडावर येण्यासाठी लोकांचा आग्रह आहे. दसऱ्याला भगवान गडावर जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र आता मी सुद्धा आग्रह धरला, तर त्याचं राजकारण होईल. मी गेलो तरी राजकारण, नाही गेलो तरी राजकारण होईल. मी गेल्या काही वर्षापासून माहूर गडावर दर्शन घेतो. ज्या दिवशी भगवानबाबांचं दर्शन होईल, तोच माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी असं धनंजय मुंडे म्हणाले.
पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
भगवानगड वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी "आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे. आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे आता काही गलिच्छपणा आपल्याला होऊ द्यायचा नाही. आणि कुणी आपल्याविषयी बोललेलंही खपवून घ्यायचं नाही. आपण आता स्ट्राँग भूमिकेने जायचं. लोकांना मारुन, त्यांच्याचविरोधात केस करुन, त्यांनाच तडीपार करतो आम्ही,..आम्ही पण साधे नाहीत", असं म्हणटलं आहे. (संपूर्ण क्लिपसाठी क्लिक करा)
ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री
पंकजां मुंडेंनी आपल्याला धमकी दिल्याची क्लिप ऐकून धक्का बसला अशी प्रतिक्रिया, नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाकडे दिली.
ती क्लिप पंकजा मुंडेंचे कार्यकर्तेच व्हायरल करीत असल्याचा आरोप नामदेवशास्त्री यांनी केला आहे.
‘माझं आजही पंकजावर मुलीप्रमाणे प्रेम आहे. पण धमकीची ती क्लिप ऐकून मला धक्का बसला आहे. पंकजानं सत्तेचा दुरुपयोग करु नये.’ असं नामदेवशास्त्री एबीपी माझाशी बोलताना म्हणाले
‘संताना मरणाची भीती नसते. त्या ऑडिओ क्लीपबाबत माझा काहीही आरोप नाही. पण त्या क्लीपनं मला धक्का बसला आहे. नेत्यांनी राजकारणासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये.’ असंही नामदेवशास्त्री म्हणाले.
पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे
‘पंकजाताई मुंडे यांचं संभाषण गंभीर आहे. कायदा तयार करणारे कायदा हातात घेण्याची उघड भाषा करतात आणि सत्ता, पदाचा गैरवापर सुरु आहे. पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा’ अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
‘कायदा हातात घेणाऱ्या अशा मंत्र्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकारच नाही. मुख्यमंत्री याप्रकरणी काय करणार याकडे आता आमचं लक्ष लागून राहिलं आहे.’ असंही धनंजय मुंडे म्हणाले.
भगवान गडाचा वाद नेमका काय?
भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे यांचं दसरा मेळाव्याला भगवान गडावरुन भाषण होत असे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली. त्याला वंजारी सेवा संघानं विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता.
मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर या गडावरुन राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका नामदेवशास्त्रींनी घेतली.
गोपीनाथ गडावरुन भाषण करावं
भगवानगडावरुन राजकीय भाषण करु नये असं सांगत नामदेव शास्त्री म्हणाले, “पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभा केला आहे. त्याठिकाणी त्यांनी राजकीय भाषण करावं”.
वंजारी संघाचा इशारा
भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
संबंधित बातम्या:
पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री
पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे
भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा
भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले
भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement