मोहिते पाटलांचं ठरलं! खुद्द शरद पवारांनीचं सगळं सांगितलं, पक्ष प्रवेश होणार पण तिकीट मिळणार का?
दोन दिवसात धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनीच दिली. जयंत पाटलांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे पवार म्हणाले.
Sharad Pawar on Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवार गटात प्रवेश करणार का? मोहिते पाटील लोकसभेची निवडणुक लढवणार का? असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात होते. मात्र, आज खुद्द शरद पवारांनींच (Sharad Pawar) सगळं सांगितलं. येत्या दोन दिवसात धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनीच दिली आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे पवार म्हणाले. मात्र, कोणतीही अपेक्षा ठेवून ते पक्षात येत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा निवडणूक लढवणार का? याबाबत शरद पवार यांनी कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील हे पक्षात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी वेट अँड वॉच अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मोहिते पाटील पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असाच सामना रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे.
14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रवेश होण्याची शक्यता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर 16 एप्रिलला ते सोलापुरात शरद पवारांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आज धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, ही सदिच्छ भेट होती अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र, भेटीनंतर लगेच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मोहिते पाटील पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं मोहिते पाटील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील काय निर्णय घेणार?
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील जरी पक्ष प्रवेश करणार असले तरी त्यांच्यासोबत आणखी कोण पक्ष प्रवेश करणार आहे का? याबाबतची माहिती मिळाली नाही. कारण सध्या धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळं ते काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: