(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'वेट अँड वॉच'! पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण, पाच वर्षांनंतर माढ्याचं राजकीय वर्तुळ होणार पूर्ण
धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार (sharad pawar) यांची पुण्यात भेट घेतली. यानंतर 'वेट अँड वॉच' अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Dhairyasheel Mohite Patil : माढा लोकसभेच्या ( Madha Loksabha Electio) दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar) यांची पुण्यात भेट घेतली. यानंतर 'वेट अँड वॉच' अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या कुटुंबियांचे जुने संबंध असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
14 एप्रिलला मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता
लवकरच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. येत्या 14 एप्रिलला मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर 16 एप्रिलला ते सोलापुरात शरद पवारांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही सदिच्छ भेट होत अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत सांगोल्याचे शेकापचे नेचे बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड देखी उपस्थित होते.
मोहिते पाटील यांचं एक राजकीय वर्तुळ पूर्ण
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षात प्रवेशानं मोहिते पाटील यांचं एक राजकीय वर्तुळ पूर्ण होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपुर्वीच मोहिते पाटलांनी शरद पवारांचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. आता पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करुन मोहिते पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांना मोठी साथ दिली होती. त्यांच्या माळशिरस तालुक्यातून निंबाळकरांना एक लाखाचं मताधिक्क्य मोहिते पाटलांनी निंबाळकरांना दिलं होतं. त्यामुळं मोहिते पाटलांनी पवार गटात प्रवेश करणं भाजपसाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: