(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Landslide : रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 89 जणांचा मृत्यू, 34 बेपत्ता; NDRF ची माहिती
रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूरपरिस्थिती आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडींखाली अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात.
या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 34 अद्यापही बेपत्ता आहेत. म्हणजेत मृतांची संख्या वाढण्याची भीती याठिकाणी व्यक्त होत आहे. कारण दोन दिवसांहून अधिकचा वेळ झाला असून येथील बचावकार्य अद्यापही सुरुच आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस, खचलेले रस्ते, उन्मळून पडलेली झाडे यामुळे एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांना इथे पोहोचण्यास उशीर झाला. बचावकार्यासाठी लागणारी यंत्रसामुग्रीही अनेक अडथळ्यांमुळे येथे वेळेत पोहोचू शकली नाही.
मिरगाव दरड दुर्घटना : दुसऱ्या दिवशी बचावकार्यावेळी जमिनीखालून आवाज आला, 65 वर्षांच्या आजी बचावल्या!
#MaharashtraRains 25/7/21
— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ଯପ୍ରଧାନ-DG NDRF (@satyaprad1) July 25, 2021
LANDSLIDE OPS UPDATES
(See chart below)
Details of landslide operations in Maharashtra @NDRFHQ @ Work #Committed2Serve🙏🏻🇮🇳🙏🏻 @HMOIndia @5Ndrf @PIBHomeAffairs @ANI @PTI_News @PIBMumbai pic.twitter.com/8u9n6PJgHb
रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सर्वाधिक 50 जणांना मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 20 जण तेथे बेपत्ता आहेत. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील पोरसे आणि चिपळूण येथील पेढे येथे दरड कोसळली. तर साताऱ्यातील तीन ठिकाणी दरडीच्या दुर्घटना घडल्या. पाटण येथील मीरगाव, ढोकवले आणि आंबेघर येथे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.
दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांची सविस्तर माहिती
तळीये - महाड- (रायगड जिल्हा)
- मृत- 50
- बेपत्ता- 20
- एकूण- 70
पोरसे- खेड- (रत्नागिरी जिल्हा)
- मृत- 15
- बेपत्ता- 02
- एकूण- 17
मिरगाव- पाटण (सातारा)
- मृत- 09
- बेपत्ता- 01
- एकूण- 10
आंबेघर- पाटण (सातारा)
- मृत- 13
- बेपत्ता- 03
- एकूण- 16
ढोकावळे- पाटण (सातारा)
- मृत- 03
- बेपत्ता- 04
- एकूण- 07
पेढे- चिपळूण (रत्नागिरी)
- मृत- 02
- बेपत्ता- 01
- एकूण- 03
एकूण
- मृत- 89
- बेपत्ता- 34
- एकूण- 123