एक्स्प्लोर

Imtiyaz Jaleel: जर I love मोहम्मद कोण म्हणत असेल तर त्यांच्या विचारांवर देखील चाललं पाहिजे, राज्यात जातिजातीत वाद लावले जात आहेत; इम्तियाज जलीलांची टीका

Imtiyaz Jaleel : "इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरातील एमआयएम कार्यालयाच्या वादावर टीका करत शाहू महाराजांचा दाखला दिला. मत चोरी, भाजपवरील आरोप आणि निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला."

AIMIM Office Kolhapur Controversy: आम्हाला विरोध करणाऱ्या फालतू लोकांनी राजर्षी शाहू महाराज (Imtiyaz Jaleel on Shahu Maharaj) यांचे काम वाचले पाहिजे, माझ्याकडे पुस्तक आहे, मी शाहू महाराज वाचले आहेत. त्याच शाहू महाराज यांच्या नगरीत हिंदू मुस्लिम वाद लावत आहेत, अशी टीका एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel Kolhapur) यांनी केली. एमआयएमचे कोल्हापुरात कार्यालय होत असल्याने (AIMIM Office Kolhapur Controversy) हिंदुत्ववादी संघटनांकडून कडाडून विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जलील यांनी विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. एमआयएम (AIMIM BJP B Team Allegations) ही भाजपची बी टीम आहे हा प्रश्न विचारून 500 वेळा झाला असून तो प्रश्न बॅन केला पाहिजे असे ते म्हणाले. जलील म्हणाले की, आपण जर भगवान रामावर प्रेम करत असाल आणि l love ram म्हटलं तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्याच पद्धतीने आय लव्ह मोहम्मद लिहिलं तर याचा इतका इशू करण्याचं कारण नाही. ते म्हणाले की, I love मोहम्मद जर कोण म्हणतं असेल तर त्यांचा विचारांवर देखील चाललं पाहिजे. त्यांनी सांगितले की, राज्यात जातिजातीत वाद लावले जात आहेत. 

हा देश कुणाच्या बापाचा नाही (Imtiyaz Jaleel criticism on BJP & Shivsena)

ते म्हणाले की, 15 मिनिटं पोलीस बाजूला करा हे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi 15 minutes speech) यांनी 2012 साली केलं होतं. त्याबद्दल त्यांना शिक्षा देखील झाली आहे, पण अनेक नेते यापेक्षा गंभीर बोलतात. बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया कसे बोलत होते ते देखील पहा. कोकणातील नेता मुस्लिमांना कसे बोलतो हे ऐकलं आहे ना? हा देश कुणाच्या बापाचा नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

 तर वाद निर्माण करण्याची गरज नाही (Imtiyaz Jaleel I love Ram I love Mohammad) 

एमआयएम भाजपची बी टीम याचं उत्तर किमान 500 वेळा दिलं असून हा प्रश्न आता बॅन केला पाहिजे. इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणूक लढवणार आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या सगळ्या निवडणुका लढवणार असून आम्हाला कोणी स्पर्श करायला तयार नाही, त्यामुळे आमच्याबरोबर कोण युती करणार नाही. एमआयएम हा एकटा लढणार आहे, पण राज्यातील कोणताही मोठा पक्ष स्वतंत्र लढवणार आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली. 

मत चोरीचा फटका मला देखील बसला (Rahul Gandhi vote theft issue support) 

इम्तियाज जलील म्हणाले की, मत चोरीचा फटका मला देखील बसला असून राहुल गांधी यांनी जो मुद्दा उचलला त्याचं आम्ही समर्थन करतो. लोकशाही टिकवायची असेल तर यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. संजय शिरसाठ आणि संदीपान भुमरे यांच्या विरोधात इतके पुरावे आहेत की हे दोघे जेलमध्ये बसले असते, पण कोणतीच कारवाई केली नाही. माझं कुणी काही करू शकत नाही यामुळे अशा गोष्टी होत असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget