Ajit Pawar : सदाभाऊंचा रापलेला चेहरा निखरलाय, लाड सासरेबुवा झालेत, दादांच्या भाषणासमोर शालजोडे फिके
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच विधानपरिषदेत चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Ajit Pawar in Vidhanparishad : अजित पवार ज्यांना लाडानं त्यांचे चाहते अजित दादा म्हणतात ते कायमच आपल्या अनोख्या भाषण शैलीसाठी चर्चेत असतात. विरोधकांबाबत कोणतंही खालच्या पातळीचं वक्तव्य न करता अजित पवार त्यांची खरडपट्टी काढतात. त्यांनी नुकतंच विधानपरिषदेत जोरदार फटकेबाजी करत सदाभाऊ खोत, संजय दौैंड, प्रसाद लाड अशा साऱ्यांना फैलावर घेतले आहे.
पवार यांनी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना त्यांची आजकाल राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढल्याचं मिश्किल विधान केलं. यावेळी ''खोत यांच्या पांढऱ्याशुभ्र ड्रेसची घडी आता फारशी मोडत नाही. सदाभाऊंच्या चेहऱ्यावर तेज, निखार कायम राहू देत, आधी आंदोलनांमुळे चेहरा कायम रापलेला असायचा. त्यात आता सदाभाऊ आणि जयंत पाटलांचीही जवळीक चांगलीच वाढलीय. हे चांगलंच आहे. आतापर्यंतची सदाभाऊंची वाटचाल पहाता त्यातही काही विशेष वाटत नाही. राजकारणात कुणी कायमचा शत्रु किंवा मित्र नसतो. परिस्थिती बदलत असते.'' असं म्हणताना पवारांनी खोत यांच्यावर चांगलीच टीका केली.
अजित पवारांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ
आमदार दौंड आणि लाड यांनाही खोपरखळी
दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिर्षासन करणाऱ्या आमदार संजय दौंड यांच्यावर प्रतिक्रिया देताना, ''शिर्षासन करण्याकरता नियमीत व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणीही उठसूठ शिर्षासन करु नये.'' असं पवार म्हणाले. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत बोलताना पवारांनी लाड यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झाल्याचा संदर्भ देत, ''प्रसाद लाड सासरेबुवा झालेले आहे, त्यामुळे मी सभागृहात काही घसरत नाही. तसंच प्रसाद लाडांच्या नावातच प्रसाद आणि लाडही आहे. आता कुणी कुणाला प्रसाद दिला आणि कुणी कुणाचे लाड केले हे मी काय बोलत नाही.'' असंही पवार म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण
- Girish Mahajan : फडणवीसांनी दाखवलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी प्रवीण चव्हाण यांच्या अडचणीत वाढ, गिरीश महाजनांची पोलीस ठाण्यात तक्रार
- Sharad Pawar On ED : मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीच्या कारवाईबाबत शरद पवार म्हणतात, "ED गावागावात पोहचलीय"
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha