Shivsena : संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र
आपल्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत असून संसदेतील कार्यालयाचा ताबा मिळावा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: विधानसभेनंतर आता शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची लढाई दिल्लीमध्ये सुरू झाल्याचं चित्र आहे. संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या असून तसं एक पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची ही मागणी करण्यात आली आहे. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत गटनेतेपदावरही शिंदे गटाने दावा केला.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन तृतीयांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर आता लोकसभेमध्येही तशाच हालचाली सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा आपल्याला मिळावा असं पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे.
संसदेमध्ये प्रत्येक पक्षाला एक कार्यालय देण्यात येतं. तसंच शिवसेनेलाही संसदेत कार्यालय देण्यात आलं आहे. शिंदे गटाने आता हे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.
लोकसभा अध्यक्ष आधीचे गटनेचे विनायक राऊत यांनाच कायम ठेवतात की नवे गटनेते राहुल शेवाळे यांना मान्यता देतात यावर बरंच काही ठरणार आहे. जर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी मान्यता मिळाली तर शिवसेनेचे हे कार्यालयही शिंदे गटाच्या ताब्यात जाणार आहे. तसं झाल्यास शिवसेनेसाठी ही गोष्ट लाजिरवाणी ठरेल.
शिंदे गटासोबत गेलेले खासदार
- राहुल शेवाळे
- भावना गवळी
- कृपाल तुमाने
- श्रीकांत शिंदे
- धैर्यशील माने
- संजय मंडलिक
- हेमंत गोडसे
- सदाशिव लोखंडे
- प्रतापराव जाधव
- श्रीरंग बारणे
- राजेंद्र गावीत
- हेमंत पाटील
महत्त्वाच्या बातम्या :
- Shivsena-BJP : उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार राहुल शेवाळे यांचे गौप्यस्फोट
- मी माझ्या परीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या पातळीवर करा, शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीसाठी दिला होता ग्रीन सिग्नल; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट
- Shivsena BJP : भावना गवळींचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू, आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवारालाच: राहुल शेवाळे