एक्स्प्लोर

Daya Nayak : अखेर दया नायक यांना बढती, सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; पण, 2 दिवसांतच होणार निवृत्त

Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे.

Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक (Daya Nayak) यांना अखेर सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी मिळाली आहे. 31 जुलै 2025 रोजी ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत.

सध्या दया नायक हे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धाडसी ऑपरेशन्स पार पाडले असून, मुंबईतील अंडरवर्ल्डचा दबदबा कमी करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. दया नायक यांच्यावरील ही उशिरा का होईना मिळालेली बढती त्यांच्या सेवा कार्याची मान्यता मानली जात आहे. मात्र, निवृत्ती अगदी दारात असताना ही बढती दिल्याने पोलीस खात्यात आणि अधिकाऱ्यांच्या वर्तुळात या निर्णयावर विविध चर्चा रंगल्या आहेत.  

कोण आहेत दया नायक?

1990 च्या दशकात मुंबई पोलीस दलातील "एन्काऊंटर स्पेशालिस्ट" म्हणून ओळख निर्माण करणारे दया नायक हे आजही अंडरवर्ल्डविरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. त्यांनी मुंबईत 80 पेक्षा जास्त कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले दया नायक कोकणी भाषिक कुटुंबातून आले. कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, 1979 मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

प्लंबर अप्रेंटिस म्हणून काम करत असताना, त्यांचा संपर्क अंमली पदार्थविरोधी विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांशी आला आणि त्यातूनच पोलीस सेवेत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. अखेर, 1995 मध्ये पोलीस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याच दरम्यान, मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव प्रचंड होता. डिसेंबर 1996 मध्ये त्यांनी जुहूमधील एन्काऊंटरमध्ये छोटा राजनच्या दोन गुंडांचा खात्मा केला आणि यानंतर त्यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली.

प्रसिद्धीबरोबरच वादही त्यांच्या वाट्याला आले. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या आरोपांमुळे 2004 मध्ये त्यांच्यावर चौकशी सुरू झाली. मोक्का न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) दया नायक यांची बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसीबीनं सहा ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबईतील अंधेरीत व करकला (कर्नाटक) येथे त्यांच्या मालकीच्या दोन लक्झरी बसेसचा तपशील समोर आला. या प्रकरणात त्यांना अटकही झाली. या वादळातून सावरत 2012 मध्ये त्यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. मात्र, 2014 मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आजवर त्यांच्या नावे 87 एन्काऊंटरची अधिकृत नोंद आहे. सध्या दया नायक गुन्हे शाखा 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक असून त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती करण्यात आली आहे. 

आणखी वाचा 

Pune Crime Rave Party : प्रांजल खेवलकरांच्या लॅपटॉपमधील फोटो अन् माहिती लीक, एकनाथ खडसेंच्या आरोपावर पुणे पोलिसांचं उत्तर; आयुक्त म्हणाले...

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Embed widget