एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना योद्ध्यांवर जमावाचा हल्ला, रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील घटना
कोरोना योद्ध्यांवर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे घडली आहे. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास 200 ते 250 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कोरोना योद्धा देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, याच कोरोना योद्ध्यांवर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे घडली आहे. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास 200 ते 250 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला आहे.
साखरी नाटे या भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानं सर्व्हेकरता गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी तेथील नागरिकांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस देखील तेथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे. शिवाय, साऱ्या परिस्थितीचं गांभीर्य देखील सांगितले. पण, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी 200 ते 250 जणांच्या जमावानं थेट हल्ला चढवला. यावेळी जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीचे नुकसान झालं. गाडीची काच फुटली. तर, वैद्यकीय विभाग आणि पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झाला. याप्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा सारा प्रकार गंभीर असून घडल्या प्रकाराबद्दल जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया सध्या पुढे येत आहेत.
जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती?
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 1379वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या 813 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 479 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 46 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 105 अॅक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून होम क्वारंटाईन असणाऱ्या रूग्णांची संख्या ही 17 हजार 148 इतकी आहे. जिल्हा रूग्णालयातर्फे 14 हजार 892 नमुने हे तपासले गेले असून त्यातील 13 हजार नमुने हे निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत इतर जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची संख्या ही 2 लाख 876 झाली असून दुसऱ्या जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या ही 1 लाख 732 इतकी आहे.
नागरिकांना आवाहन
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन नाही. पण, राज्य शासनाचे नियम मात्र पाळले जात आहेत. कोरोना रूग्णांची संख्या ही वाढत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील सध्या एसटी सेवा सुरू असून काही नियम आणि अटींवर खासगी वाहनांना देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या रिक्षा देखील रस्त्यावर धावताना दिसत आहेत. पण, त्यांना देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement