संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत! विदर्भातील संत्र्यासाठी बांग्लादेशची बाजारपेठ हळूहळू बंदच होणार?
भारतीय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर बांगलादेशने आणली संक्रांत!!! भारतीय संत्र्यावर पुन्हा आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ
Orange crisis: भारतीय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर बांग्लादेशच्या आयात शुल्कवाढीमुळे संक्रांत आल्याचं चित्र आहे. गेल्या पाच वर्षांपासून सतत वाढवल्या गेलेल्या आयात शुल्काचा फटका विदर्भातल्या संत्रा उत्पादकांना बसलाय. बांग्लादेशाने पुन्हा एकदा भारतातून पाठवल्या जाणाऱ्या संत्र्यावर प्रति किलो 116 रुपयांची वाढ केल्याने आता विदर्भातून बांगलादेशला दरवर्षी होणारी दोन ते अडीच लाख टन संत्र्याची निर्यात पूर्णपणे थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत असताना बांगलादेशने पुन्हा एकदा भारतातील संत्र्यावर आयात शुल्कात (Import Duty) भरमसाठ वाढ केल्याने विदर्भाचं संत्र बांगलादेशला नकोच आहे का?? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारीच बांगलादेशने भारतातून बांगलादेशला पाठवल्या जाणाऱ्या संत्र्यावर प्रति किलो 116 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क आकारायला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही हांगामापूर्वीपर्यंत हे आयात शुल्क 75 रुपये प्रति किलोच्या जवळपास होते. नंतर त्यात वाढ करून ते 82 रुपये करण्यात आले. पुन्हा वाढ होऊन ते 91 रुपये झाले. दोन दिवसांपूर्वीपर्यंत ते 101 रुपये प्रति किलो एवढे होते. तर आता पुन्हा त्यात वाढ करून ते 116 रुपये प्रति किलो एवढे वाढवण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातून शेतकऱ्यांचा दर्जेदार संत्रा गोळा करून बांगलादेशला निर्यात करणारे निर्यातदार प्रचंड अडचणीत सापडले आहे.
काय परिणाम होऊ शकतात?
* आंबिया बहारनंतर नुकतच सुरू होणाऱ्या मृग बहाराच्या पूर्वी बांगलादेश ने भारतीय संत्रावर लावलेले प्रचंड आयात शुल्क भारतातून बांगलादेशला होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प करणारे ठरू शकते...
* याचे परिणाम फक्त निर्यातदार आणि मोठे व्यापारी यांनाच भोगावे लागणार नाही तर संत्रा उत्पादक शेतकरी ही भविष्यात मोठ्या आर्थिक अडचणीत सापडू शकतो...
* बांगलादेश ला 17 साठी पर्यायी बाजारपेठ शोधण्याची वेळ भारतीय संत्रा निर्यात काय झाले व्यापारी आणि मोठ्या संत्रा उत्पादकांवर येऊ शकते..
* बांगलादेश ला जाणारा अडीच लाख टन संत्रा स्वस्तात भारतीय बाजारपेठेत खपवण्याची वेळ येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते..
संत्र्याची बांग्लादेश निर्यात निम्म्यावर
बांग्लादेश ही भारतातील संत्र्याची प्रमुख बाजारपेठ आहे. देशातला सर्वाधिक संत्रा उत्पादक प्रदेश अशी ओळख असणाऱ्या एकट्या विदर्भात 126 हजार हेक्टरमध्ये संत्रा शेती होते. दरवर्षी विदर्भात अंदाजे 8 लाख मेट्रीक टन संत्र्याचं उत्पादन होतं. बांग्लादेश गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आयात शुल्क वाढवत आहे. याचा स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतोय. विदर्भ या हंगामात बांग्लादेशला दररोज सुमारे 60 ट्रक संत्र्याची निर्यात करतो. आता ही संख्या निम्म्यावर आली आहे. निर्यात आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये 141,000 MT वरून 2023-24 मध्ये अपेक्षित 25,000 MT पर्यंत घसरत असल्याचे दिसून येते.