एक्स्प्लोर
कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, दुसरा संशयित आरोपी अटकेत
धुळ्यात भररस्त्यात गुंड गुड्ड्याच्या हत्याप्रकरणी आता दुसऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून अद्यापही बरेच आरोपी फरार आहेत.

फाईल फोटो
धुळे : धुळे शहरातील कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्या प्रकरणातील आरोपी राजा भद्राच्या भावाला आता अटक करण्यात आली आहे. दादू देवरे असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नांव आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. उर्वरित आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, शनिवारी (22 जुलै) सागर साहेबराव पवार या प्रमुख आरोपीला कामशेतमधून अटक करण्यात आली होती. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. 18 जुलैला पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास गुंड गुड्ड्याची कराचीवाला चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या टोळी युद्धातून झाल्याचं बोललं जात होतं. याप्रकरणी गोयर आणि देवरे गटातील 11 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यातील प्रमुख आरोपी सागर साहेबराव पवार आणि दादू देवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच गुड्ड्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी पहाटे त्याची गोळ्या झाडून हत्या झाली. संबंधित बातम्या: कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, एका संशयिताला अटक धुळ्यात कुख्यात गुंडाचा गोळ्या झाडून खून
आणखी वाचा























