नांदेडमधील गँगवॉर ठरतंय पोलिसांची डोकेदुखी, फिल्मी स्टाईलनं डोक्यात गोळी झाडून गुडांची हत्या
नांदेडमधील गँगवॉर सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फिल्मी स्टाईलनं एका गुंडाची डोक्यात गोली झाडून हत्या करण्यात आली. तर तलवारीनं त्याच्यावर वारही करण्यात आले.
नांदेड : नांदेड शहरात गुन्हेगारी सत्र सुरुच गँगवारमधून एका गुंडाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी विक्की ठाकूर नामक गुंडाची हत्या केली. तीन गोळ्या झाडून आरोपींनी विक्की ठाकुरला जखमी केलं, त्यानंतर त्याच्यावर तलवारीने अनेक वार करून खून करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास नांदेड शहरातील गाडीपुरा भागात ही घटना घडली. या हत्येला गॅंगवार कारणीभूत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मयत विक्की ठाकूर हा देखील गुंड होता. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. मयत गुंड विक्की ठाकूर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता.
एका वर्षापूर्वी नांदेडमध्ये विक्की चव्हाण नामक गुंडाचा अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. कैलास बिगानिया नामक गुंडाने आपल्या अन्य साथीदारासह विक्की चव्हाणचा खून केला होता. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा खास साथीदार होता. विक्की ठाकूर काही दिवसापूर्वी तुरुंगातून जामिनावर सुटला होता. मंगळवारी रात्री विक्की ठाकूर गाडीपुरा भागात आपल्या घराजवळ थांबला होता. तेव्हा दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. नेम चुकल्याने विक्की ठाकूर धावत सुटला.
त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर गाठलं. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी विक्की ठाकूरच्या डोक्यात लागली आणि तो जागीच ठार झाला. नंतर आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. हे गुंड एवढ्यावरच थांबले नाही तर जमिनीवर पडलेल्या विक्की ठाकूरच्या शरीरावर आरोपींनी तलवारीने अनेक वार केले. विक्की ठाकूर मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर शहरभर वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहे. परिसरात एकच धावपळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल होऊन पोलिसांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केलाय कुख्यात गुंड कैलास बिगनीया याचा भाऊ नितीन बिगानीया, गंगाधर बोकारे यांच्यासह अन्य गुंडांनी विक्की ठाकूर याची हत्या केली असल्याचा संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सुरु आहे. आतापर्यंत कोणतेही आरोपी ताब्यात घेण्यात आले नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :