एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'लिंगाऐवजी बोटांचा वापर करणं हा बलात्काराच!', गतिमंद मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला हायकोर्टाकडून दिलासा नाही

महिलेवर अत्याचार करताना तिच्या गुप्तांगामध्ये बोटांचा वापर करणं हा बलात्कारच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवत गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.

मुंबई : एखाद्या महिलेवर अत्याचार करताना तिच्या गुप्तांगामध्ये बोटांचा वापर करणं हा बलात्कारच आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवत एका गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी याचिकाकर्त्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.

मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या एका 33 वर्षीय आरोपीवर 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता आणि हा तरुण एकाच परिसरात राहतात. या तरुणाने पीडितेला जत्रेच्या निमित्ताने फिरायला नेले. जत्रेला नेल्यावर त्याने तेथील जवळच्याच एका निर्जन स्थळी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडिता रडू लागल्याने घाबरून त्याने तिला घरी सोडले. दरम्यान, पीडितेचे कुटुंबीय तिला शोधत होते.

Gujarat High Court : गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आजपासून कारवाईचे होणार लाईव्ह प्रक्षेपण

पीडित तरुणीने घरी गेल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रसंग घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी आरोपीला पकडून त्याच्या विरुद्ध पोलिसात बलात्काराची तक्रार केली. त्यावर चाललेल्या खटल्यामध्ये आरोपीला बलात्कार आणि अपहरण प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिक्षेविरोधात आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर नुकतीच न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

लोकशाहीच्या हितासाठी राज्यपालांनी हेवेदावे विसरुन 12 सदस्यांची नेमणूक करावी : राज्य सरकार

आपल्यावरील बलात्काराचा आरोप काढून त्या ऐवजी लैंगिक अत्याचाराचा आरोप करावा अशी मागणी आरोपीनं या याचिकेतून केली होती. बलात्काराच्या व्याख्येनुसार लिंगाचा योनीत जबरदस्तीनं प्रवेश होणं अपेक्षित असतं. पण इथे आरोपीनं केवळ बोटांचा वापर केल्यानं हे प्रकरण लैंगिक अत्याचार म्हणून चालवण्यात यावं अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

मात्र लिंगाऐवजी बोटांचा वापर हा देखील बलात्कारच असल्याचं यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात जरी लिंग आणि योनीचा संबंध आलेला नसला तरीही पीडितेच्या अंतर्गत अवयवांना जखमा झालेल्या वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्या आहेत. याशिवाय तिच्यावर अत्याचार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडून जे न्यायवैद्यकीय पुरावे जमा झाले आहेत, ते आरोपीशी तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे बलात्काराचा आरोप रद्द करता येणार नाही. असं स्पष्ट करत हायकोर्टानं आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवारABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सHitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Embed widget