एक्स्प्लोर

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या

भिवंडी येथे अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडी : दीड तोळ्यांच्या सोनसाखळीसाठी 14 वर्षीय मुलाची हत्या ही घटना ताजी असतानाच खानावळीसाठी घरी येणाऱ्या कामगाराचे मुलाच्या आईशी अनैतिक संबंध असल्याने आठ वर्षाच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीत घडली आहे.

भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरील राहणाऱ्या एका कुटुंबाचा 8 वर्षाचा मुलगा हा दुपारपासून बेपत्ता झाल्याने परीसरात शोधूनही त्याचा शोध न लागल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्या नुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला असता त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळून आला होता. भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता त्या परिसरातील संशयित जितेंद्र मधेशिया यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबुल केले. 

आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. त्यावेळी तो हत्या झालेल्या मुलाच्या आईसोबत शारिरीक लगट करीत असल्याबाबत मुलाने आपल्या वडिलांना गोष्ट सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली. मुलाने आपले कारस्थान सांगितल्याने आपले बिंग फुटले याचा राग मनात ठेवून जितेंद्र याने आठ वर्षीय चिमुरड्यास खेळण्याच्या बहाण्याने बोलवून आपल्या सोबत चौथ्या मजल्यावर घेऊन गेला व त्या ठिकाणी त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चिमुरड्याची हत्या करणारा जितेंद्र मधेशिया यास अवघ्या अठरा तासात अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता आरोपीस 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
Bhandara Crime News : भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक
भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक
Nashik Manisha Jejurkar Case: मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
Embed widget