LIVE UPDATES | प्रत्येक राजकीय पक्षांनी मराठा समाजाची मतं घेतली आता परतफेड करण्याची वेळ आली आहे : राजू शेट्टी
शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असताना जिओ विरुद्ध एअरटेल, व्होडाफोन-आयडीया वाद ट्रायच्या दारात आनंदाची बातमी... अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण सुरु, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणीत वाढ दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असताना जिओ विरुद्ध एअरटेल, व्होडाफोन-आयडीया वाद ट्रायच्या दारात
रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला पत्र लिहून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. टेलिकॉम सेक्रेटरी एस के गुप्ता यांना जियोने लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जियोने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलवर आरोप करत म्हटलं आहे की, दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
जिओने पत्रात आरोप केले आहेत की, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतातातील विविध भागांतील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या संतापाचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. रिलायन्स जियोचं म्हणणं आहे की, यापूर्वी 28 सप्टेंबर, 2020 मध्येच जिओने ट्रायला एक पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. परंतु असे असूनही या दोन्ही कंपन्यांनी कायदा असल्याचे भासवून आपली नकारात्मक प्रसिद्धी कायम ठेवली आहे.
आनंदाची बातमी... अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण सुरु, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहेत. अशात एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरणाला सुरु झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली आहे. लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तसेच जगातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेत कोरोनावर वापरण्यात येणारी ही पहिली लस आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणीत वाढ
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणी वाढणाची शक्यता आहे. 102 एकरचा हा भूखंड एमएमआरडीएला मेट्रो कारशेडसाठी देताना जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशात त्रुटी असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी आपला यासंदर्भातला निर्णय मागे घेत याप्रकरणाची नव्यानं सुनावणी घ्यावी. अन्यथा आम्ही त्या आदेशाबाबतच्या कायदेशीरबाबी पडताळून त्याची वैधता ठरवू असे स्पष्ट संकेत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. यावर उत्तर देताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला सांगितला की, सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं अधिकारी त्यात व्यस्त आहेत. यंदाचं हे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोनच दिवसांचं असल्यानं येत्या बुधवारी यावर राज्य सरकारच्यावतीनं उत्तर दिलं जाईल. तेव्हा हायकोर्टानं यावर बुधवारी सकाळी साडे 10 वाजता सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
कांजूरमार्गमधील या भूखंडावर एका खाजगी विकासकानंही आपला दावा सांगत दिवाणी याचिका दाखल केलेली असताना त्याचीही बाजू जिल्हाधिका-यांनी ऐकणं आवश्यक होतं. कोर्टात प्रलंबित असलेल्या खटल्याची माहिती असूनही त्याकडे कानाडोळा करत जर जिल्हाधिका-यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल तर ते योग्य नाही, असं मत यावेळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं.