आनंदाची बातमी... अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण सुरु, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस
अमेरिकेत आजपासून कोरोना लसीकरणाला सुरु झालं आहे. लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तसेच जगातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Pfizer Corona Vaccine: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहेत. अशात एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरणाला सुरु झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली आहे. लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तसेच जगातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेत कोरोनावर वापरण्यात येणारी ही पहिली लस आहे.
First Vaccine Administered. Congratulations USA! Congratulations WORLD!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 14, 2020
फायझर आणि बायोएनटेकची भागिदारी
फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे.
ब्रिटनमध्ये लसीकरणास सुरुवात या लसीच्या वापराला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला होता. त्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. बहारीन आणि कॅनडातही लवकरच लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
भारतातही Pfizer-BioNtech या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे. भारतात एकूण आठ लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु असल्याचं समजतंय. जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. अदर पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना सांगितलं की, या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, डिसेंबर अखेरपर्यंत एसआयआयला वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते. परंतु, या लसीच्या वापरासाठी परवानगी नंतर मिळू शकते. यावेळी बोलताना त्यांनी, जानेवारी, 2021 मध्ये भारतात कोरोना लसीच्या लसीकरणाच्या अभियानाला सुरुवात होऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :