(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATES | ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथे 2 लोकांचा जीव घेणाऱ्या बिबट्या जेरबंद
14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा! महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तारखा जाहीर करमाळ्यात नरभक्षक बिबट्याचा थरार सुरूच, तीन फायर चुकवून, ट्रॅप भेदून पुन्हा वन विभागाला चकवा मेट्रोचा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या पैशातून आणि ती जागाही नागरीकांचीच : हायकोर्ट दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जगभरातील सर्वच लोक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. अशातच सर्व देशांचं लक्षं भारताकडे लागलं आहे. भारतात पुढिल काही दिवसांतच कोरोना वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाऊ शकते. भारतीय ड्रग्ज कंट्रोलरच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी तीन वॅक्सिन आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी विचारात घेतल्या जात आहेत. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट आणि हैदराबादची औषध कंपनी भारत बायोटेकनं याआधीच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन (सीडीएससीओ) च्या एक तज्ज्ञ कमिटीच्या वतीने सीरम आणि भारत बायोटेकच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जाचं विश्लेषण करण्यात आलं. त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा आणि लस कितपत प्रभावी आहे, त्यासंदर्भात अधिकची माहिती संबंधित कंपन्यांकडे मागण्यात आली आहे. अमेरिकन औषध कंपनी फायझरनेही भारतात लसीच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय सध्या सुरु असलेल्या लसींच्या चाचण्यांसाठी तिनही कंपन्यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते.
युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नाही, शरद पवार यांची एबीपी माझाला माहिती
राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विरोधी राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्ष एकत्र येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचं नेतृत्व करणार असल्याच्या बातम्या माध्यमांधून येत आहेत. मात्र, युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले आहेत. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी या कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे. असं असताना देशातील विरोधी पक्ष मात्र अजून एकत्र येत असल्याचे चित्र नाही. कालच विरोधी पक्षातील शरद पवार, राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि डी.राजा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात पंजाबमधील अकाली दलाचा समावेश मात्र नव्हता.
दुसरीकडे पंजाब मधील अकाली दल देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अकाली दलातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. असं असलं तरी सर्व पक्ष अजूनही शेतकरी कायद्याविरोधात ही एकत्र येताना दिसत नाहीये.
करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याने आज दुपारी बाराच्या सुमारास नरसोबावाडी सांगवीजवळ भागात शेतात काम करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पत्नीवर झडप मारली. यावेळी त्यांनी बिबट्याची झडप चुकवली यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दगडाचा भडीमार संबंधित नरभक्षक बिबट्या व केल्यानंतर तो बिबट्या तिथून पळून गेला.
पळून गेल्यानंतर तो बिबट्या रामचंद्र महादेव कदम यांच्या उसाच्या शेतात गेला दुपारी दीड वाजल्यानंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना कळाली. वन विभागाच्या 70-80 कर्मचाऱ्यांनी या या उसाच्या पाच एकराच्या फडाला घेराव घातला असून शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले आहेत. रात्री 9 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले पण त्यांना यश आले नाही.