LIVE UPDATES | माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांची आत्महत्या
आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं : राहुल गांधी पांढऱ्या सोन्याला यंदा 5825 रुपये हमीभाव! कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु शेतकऱ्याचा पोर झाला दख्खनचा राजा, सांगलीचा विशाल झळकणार जोतिबावरच्या मालिकेत IPL 2020, MIvsRR :मुंबई इंडियन्सचा विजयाचा चौकार, मुंबईकडून राजस्थानचा 57 धावांनी पराभव दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, आपल्या देशात पाऊल टाकण्याइतकी चीनची हिंमत नव्हती. आज संपूर्ण जगात एकच देश आहे ज्या देशामध्ये दुसर्या देशाच्या फौजेने घुसखोरी केली आहे आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की या देशाची जमीन कोणी घेतली नाही, असा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल केला.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी कापसाची लागवड करतात. मागील हंगामाचा कापूस पणन महासंघाला जून महिन्यांपर्यत खरेदी करावा लागला होता. यंदा मात्र मागील वेळी झालेली धावपळ न बघता पणन महासंघ आणि सीसीआयने कापूस खरेदीच्या अनुषंगाने कापूस नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून जिल्हाभर सुरु केली आहे. यावेळी लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825 असा हमीभाव मिळणार असल्याने आता शेतकरी नोंदणी केंद्राकडे विचारपूस करण्यासाठी बाजार समितीमध्ये येताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. खरिपात जिल्ह्यात 9 लाख हेक्टरपैकी साधारण 5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पावसाळा सुरु झाला तेव्हापर्यंत कापूस खरेदी करावी लागली होती. त्यात अनेक ठिकाणी बोगस नोंदणीसुद्धा झाल्या होत्या त्यामुळे कापूस खरेदी करताना मोठा गोंधळ उडाला होता. आता शेतकऱ्यांनीच कापूस खरेदी केला जावा या दृष्टीने कापसाची पूर्व नोंदणी सुरु केली आहे. कापूस खरेदीमध्ये कुठेही गडबड होऊ नये म्हणून पणन आणि सीसीआयचे लवकरच एक मोबाईल अँप सुद्धा पुढील काही दिवसात आणणार आहे. शिवाय कापूस नोंदणीसाठी यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ग्रीन कार्ड तयार केले जाणार आहे. शासनाची कापूस खरेदी सुरु झाल्यावर नोंदणी केलेले शेतकरी तात्काळ कापूस विक्री करू शकतील. या ग्रीन कार्डद्वारे व्यापारी गैरफायदा घेऊ शकणार नाही, अशी यात प्रक्रिया आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली आहे.
अबुधाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईनं राजस्थानला 194 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 19.1 षटकात 136 धावात आटोपला. राजस्थानच्या जोस बटलरनं 70 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. मुंबईकडून जसप्रीत बुमरानं 20 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सननं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सहा सामन्यातला चौथा विजय ठरला. तर राजस्थानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्ससमोर 194 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं 47 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. त्यात 11 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारचं यंदाच्या मोसमातलं हे पहिलच अर्धशतक ठरलं. याशिवाय कर्णधार रोहित शर्मानं 35 तर हार्दिक पंड्यानं नाबाद 30 धावा फटकावल्या.