Coronavirus Update | राज्यात 2361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 779 रुग्ण कोरोनामुक्त
आज 779 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 30108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 2361 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70013 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 37 हजार 234 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2362 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 779 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 30108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढलं
कोरोना रुग्णांचं बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांची तुलना केली तर, - मार्च महिन्यात 302 पैकी 39 असे 12.91 टक्के रुग्ण बरे झाले होते. - एप्रिल महिन्यात 10,498 पैकी 1773 असे 16.88 टक्के रुग्ण बरे झाले. - मे महिन्यात 67,655 पैकी 29,329 असे एकूण 43.35 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. - राज्यातील मृत्यूदर 3.37 टक्के आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 45 पुरुष तर 31 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 76 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 37 रुग्ण आहेत तर 36 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर ४० वर्षांखालील 3 रुग्ण आहेत. या 76 रुग्णांपैकी 51 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आज नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 40, मीरा भाईंदर 6, नवी मुंबई 6, वसई विरार 3, रायगड 2, कल्याण डोंबिवली 2, ठाणे 1, नाशिक 1, पुणे 8, पिंपरी चिंचवड 1, औरंगाबाद मनपा 3, जालना 1, बीड 1, नागपूर मनपा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 54 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 54 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 मे ते 28 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 22 मृत्यूंपैकी मुंबई 9, नवी मुंबई 5, औरंगाबाद 3, रायगड 2, बीड 1, मीरा भाईंदर 1 आणि ठाणे 1 येथील आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 71 हजार 573 नमुन्यांपैकी 70 हजार 013 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या 36 हजार 189 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
संबंधित बातम्या
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या विदर्भातील सर्व कोरोना योद्ध्यांची चाचणी करा : हायकोर्ट
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी मोठ्या घोषणा
Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
