एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबाबात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

नवी दिल्ली : मोदी 2.0 सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अंतर्गत शेतकऱ्यांसह मजुर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या घटकांसाठी काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित होते.

आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांवर जास्त भर दिला. हे उद्योगधंदे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे जावडेकर म्हणाले. देशात 6 कोटी एमएसएमई आहेत. त्यांना 3 लाखाचे कर्ज 2 टक्के व्याज दराने मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, एमएसएमईसाठी केंद्र सरकारची निर्यातीबाबत विशेष योजना आहे. यात 2 लाख एमएसएमईचं काम सुरु करणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला खर्चाच्या दीडपड हमीभाव देण्याचं आपलं वचन पूर्ण केलं आहे. 2020-21 मधील खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या 14 पिकांसाठी सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. या 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना जवळपास 50-80 टक्के अधिक किंमत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले.

निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद राहणार की जाणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा

सरकारचं सर्वोच्च प्राधान्य गरिबांनाच या मोदी सरकारचं प्राधान्य हे गरिबांनाच आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सरकार गरिबांद्दल संवेदनशील राहिलं आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर दोनच दिवसात आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्यात आली. 20 कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पोहचवण्यात आली. पीएम किसान योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरुपात मदत देण्यात आली. त्यामुळे गरिबांना याचा फायदा झाल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

महत्वाचे मुद्दे :
  • 14 प्रकारच्या शेतमालाला किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) मूळ किंमतीच्या दीडपट मिळणार
  • शेतमालातून शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नात 50 ते 80 टक्क्यांपर्यत वाढ होणार
  • 3 लाख रुपयांच्या अल्पकालीन कर्जासाठीची मुदत वाढवण्यात आली.
  • एमएसएमईला इक्विटी भांडवल उभारता येणार, शेअर बाजारात यापुढे नोंदणी करता येणार
  • एमएसएमईला 20 हजार कोटी रुपयांची मदत करण्यास कॅबिनेटची मंजूरी
  • एमएसएमईला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार.
Monsoon Forecast | यंदा मान्सून सामान्य राहणार; देशात सरासरीच्या 102 टक्के पावसाची शक्यता : आयएमडी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
Embed widget