एक्स्प्लोर

Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...

Bihar Election 2025 Phase 1 Voting:  बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 121 जागांवर मतदान झालं.  मागील निवडणुकीत या ठिकाणी 55.81 टक्के मतदान झालं होतं. यंदा 5 वाजेपर्यंत 60.13 टक्के मतदान झालं आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान पार पडलं. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान हे दाखवतं की जनतेला बदल हवा आहे. नवी व्यवस्था येत आहे.  
 
बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं. यावेळी सायंकाळी 5 वाजता मतदानाची आकडेवारी 60.13 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, नव्या माहितीनुसार बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी महिलांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. प्रशांत किशोर यांचा पक्ष यावेळी पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला किती जागांवर विजय मिळतो ते पाहावं लागेल. 

महागठबंधनचे नेते काय म्हणाले?

दुसरीकडे महागठबंधनच्या नेत्यांनी या  वाढलेल्या मतदानासंदर्भात वेगवेगळे दावे केले आहेत. भाकप (मार्क्सवादी) चे महासचिव एमए बेबी यांनी गुरुवारी म्हटलं की महागठबंधनच्या प्रचाराला बिहारच्या लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तरुण नफरत आणि द्वेषाच्या राजकारणाला स्वीकारणार नाहीत, असं ते म्हणाले.   

सीपीआयचे महासचिव एमए बेबी यांनी म्हटलं की महागठबंधननं लोकांच्या कल्याणाचे, उपजिविकेचे मुद्दे मांडले आहेत. बेबी म्हणाले की, महागठबंधनच्या प्रचाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही लोकांच्या कल्याण आणि उपजिविकेच्या मुद्यांना समोर आणण्यात यशस्वी ठरलो आहेत, असंही ते म्हणाले.  

बिहारमध्ये बदल होणार : मुकेश साहनी

विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहून बिहारमध्ये बदलाची लाट असल्याचं म्हटलं. बंपर मतदान झालं आहे, अशी माहिती मिळाली आहे. आता पूर्ण बिहारमध्ये बदल होईल आणि महागठबंधनचं सरकार बनेल, अशी आशा असल्याचं मुकेश साहनी म्हणाले.  

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 150 पेक्षा अधिक जागा जिंकेल किंवा 10 पेक्षा कमी जागा जिंकेल असं वक्तव्य केलं होतं.  याशिवाय किशोर यांनी बिहारला तिसरा पर्याय हवा आहे, असंही म्हटलं. बिहार विधानसभेच्या राहिलेल्या 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होईल. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.  बिहारचे मतदार यावेळी कोणत्या आघाडीला सत्तेत बसवणार हे पाहावं लागेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget