एक्स्प्लोर

शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं आज एकदिवसीय 'कामबंद' आंदोलन; 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा आणि त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशा मागण्यांसाठी राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातील डॉक्टर आज एकदिवसीय काम बंद आंदोलन करत आहेत.

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. तर दुसरीकडे वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखण्याचं आवाहन प्रशासनासमोर आहे. अशातच आता कोरोना संकटात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे. राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातील डॉक्टर आज एकदिवसीय काम बंद आंदोलन करत आहेत. तसेच शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मात्र 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. 

शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा आणि त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशा मागण्या डॉक्टरांच्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर्स आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. परंतु, शासनानं वेळोवेळी आश्वासनं देऊन त्यांचं आंदोलन मागे घेण्यास त्यांना भाग पाडलं. पण आज मागण्या मान्य नाही झाल्या तर 22 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी दिला आहे. 

आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोना संकटात एकाही दिवसाची सुट्टी न घेता, तसेच क्वॉरंटाईन लीव्ह न घेता हे सर्वजण 24 तास काम करत होते. तरिदेखील सर्व डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तरिदेखील प्रशासनाकडून यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या आहेत की, शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा, तसेच शासनाचा जो सातवा वेतन आयोग आहे, तो लागू करा. अशातच जर डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या तर शासनावर आर्थिक भार येईल, असं चित्र रंगवण्यात येत आहे. परंतु, असं काहीही होणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकराच लवकर आमच्या मागण्या मान्य करा असा इशारा त्यांनी दिलेला आहे. 

दरम्यान, राज्यभरातील डॉक्टरांनी आज 24 तासांचा इशारा प्रशासनाला दिला आहे. जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मात्र 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवारPune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Embed widget