ब्रिटनमधून 55 नागरिक कल्याणात, पालिकेच्या आरोग्य विभागाची तपासणीसाठी धावपळ
कल्याणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना गेल्या महिनाभरात ब्रिटनवरुन आलेल्या प्रवाशांमुळे या परिसरातील नागरिकांचं टेन्शन पुन्हा एकदा वाढल्याचं पहायला मिळतंय.
कल्याण: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देशात गेल्या महिन्याभरात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. कल्याणमध्ये 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान 55 नागरिक ब्रिटनमधून परतले असून या नागरिकाची यादी राज्य शासनानं महापालिकेला धाडली आहे. या सर्वांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाची सुरु आहे. तपासणी दरम्यान या नागरिकांमध्ये काही लक्षणं दिसल्यास त्यांचे स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेत धाडले जाणार असल्याचंही पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. राज्य शासनाच्या या माहितीमुळे कल्याणमध्ये गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
कल्याण-डोंबिवली मधील कोरोना रुग्णाचे प्रमाण वेगाने कमी होत असून सध्या केवळ 1000 रुग्ण उपचार घेत असून 55 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र राज्य शासनाच्या या नव्या यादीमुळे मागील नऊ महिन्यानंतर आता कुठे मोकळा श्वास घेत असलेल्या पालिका प्रशासनाची झोप उडाली असून आरोग्य विभागाची धावपळ वाढली आहे.
या नागरिकाची नावं, पत्ते, फोन नंबरची यादी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे धाडण्यात आली असून या नागरिकांना संपर्क करून त्यांची पुन्हा चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखादा प्रवासी पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे सॅम्पल पुढच्या टेस्टसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत .
ब्रिटनवरुन आलेले 20 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह ब्रिटनच्या घटनेनंतर भारताने 23 डिसेंबरपासून ब्रिटनवरुन येणाऱ्या सर्व विमानसेवांना स्थगिती दिली आहे. त्या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्याभरात ब्रिटनवरुन आलेल्या प्रवाशांची माहिती इमिग्रेशन ब्युरोकडे मागितली असून ती यादी संबंधित राज्यांना देण्यात येत आहे. 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटनवरुन भारतात आलेल्या एकूण प्रवाशांपैकी 20 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच सर्व प्रवाशांना होम क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमूळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या: