lockdown | मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भात काँग्रेसची बैठक; मजूर संख्या, खर्चावर चर्चा
, मजूरांचा घराकडे जाण्याचा खर्च कँग्रेस करणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांशी चर्चा केली. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी मजूर नोंदणी करुन त्यांची यादी करत आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. जवळपास एक महिन्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी परवानगी मिळाली खरी पण केंद्र सरकारने रेल्वेच्या तिकीटाचा खर्च मजुरांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मजूर अडचणीत असल्याने त्यांचा खर्च कॉंग्रेस करणार असल्याता निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे. त्यासाठीची तयारी कॉंग्रेसने सुरू केल्याची माहिती कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात आणि मंत्रिमंडळातील काँग्रेस मंत्र्यांची व्हीसी बैठक झाली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, मजूरांचा घराकडे जाण्याचा खर्च कँग्रेस करणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांशी चर्चा केली. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी मजूर नोंदणी करुन त्यांची यादी करत आहे. रेल्वे कधी सुटणर, किती मजूर जाणार, किती खर्च अपेक्षित आहे याची माहिती घेऊन जेवढा खर्च होणार आहे तेवढा देण्यात येणार आहे. त्या हिशोबाने कॉंग्रेसची तयारी सुरू झाली आहे.
लॉकडाऊळे अडकून पडलेल्या मजुरांचा प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्ष उचलणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्षा मा. सोनिया गांधी यांनी केली आहे. महाराष्ट्रातील मजूरांचा प्रवासखर्च @INCMaharashtra करणार आहे. काँग्रेस मत्र्यांच्या बैठकीत ममजूरांच्या प्रवासासंदर्भातील नियोजनाबाबत चर्चा झाली pic.twitter.com/WBzPMQ5cak
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 4, 2020
विधानपरिषद निवडणुकांबाबत थोरात म्हणाले, विधानपरिषदेत नऊ जागांची निवडणूक आहे. आमच्याकडे ज्या जागा आहेत प्रत्येकाला 2 जागा मिळतील. 6 जागा आम्ही निवडून आणू शकतो. काँग्रेस कोटा आहे. आमच्याकडे सहावी जागा निवडून यावी इतकं संख्याबळ आहे.
24 मार्च रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाली त्यावेळी लाखो मजूर ज्या ठिकाणी आहेत तिथेच अडकले. यानंतर जवळपास 40 दिवसांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारांच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष ट्रेनला मंजुरी दिली आहे. परंतु तिकीटाचा खर्च मजुरांकडूनच घेतला जाईल, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयावर सडकून टीकाही करण्यात आली. केवळ राजकीय पक्षच नाही तर राज्य सरकारांनीही याचा विरोध केला. सोशल मीडियावरही रेल्वे मंत्रालयावर टीकेची झोड उठली.
संबंधित बातम्या :
घरी परतणाऱ्या मजुरांबाबत सोनिया गांधींची मोठी घोषणा, काँग्रेस रेल्वे तिकीटाचा संपूर्ण खर्च उचलणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
