(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी गोंदियात तीन तर भंडाऱ्यात एका अंडरपास पुलाची निर्मिती
वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय वन्य जीव संस्थेच्या (National Highways and Wildlife Institute of India) पुढाकार घेतलाय. जंगल परिसरात अंडरपासची निर्मिती करण्यात येत आहे.
Wildlife safety : वन्य जीवांचा (Wildlife)अधिवास आणि भ्रमणक्षेत्र असलेल्या परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनाची भरधाव वर्दळ असते. अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांचे जीव गेलेले आहेत. त्यामुळं वन्य प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय वन्य जीव संस्थेच्या (National Highways and Wildlife Institute of India) पुढाकारातून जंगल परिसरात अंडरपासची निर्मिती करण्यात येत आहे. गोंदिया (Gondiya) जिल्ह्यात तीन तर, भंडाऱ्यात (Bhandara) एका ठिकाणी अंडरपासचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
भंडारा जिल्ह्यातील मुंडीपार ते साकोली दरम्यान मोहघाटा जंगलातील दोन किलोमीटरचा परिसर वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा मार्ग आहे. याच महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असल्यानं मागील अनेक वर्षात अनेक वन्यप्राण्यांचा वाहन अपघातात जीव गेलेला आहे. त्यामुळं या मार्गावर वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी 700 मीटरचा अंडरपास तयार करण्यात येत आहे. सध्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून दुतर्फा असलेल्या या मार्गावरील एकतर्फा मार्ग सध्या वाहतुकीसाठी तयार करून वाहनांच्या आवागमनासाठी सुरू करण्यात आला आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात चार अंडरपासची निर्मिती
दरम्यान, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात चार अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. चार पॅचमध्ये 750 मीटरचे तीन आणि 700 मीटरपैकी एक पाच मीटर उंचीचे अंडरपास असतील. शिवाय 26 कल्व्हर्ट असतील. प्रकल्पासाठी 540 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सिरपूर-नवाटोला (700 मीटर), मरमजॉब-डोंगरगाव (750 मीटर), बाम्हणी-डुग्गीपार (750 मीटर) आणि साकोली-मुंडीपार (750 मीटर) यादरम्यान अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: