Beed: विष्णू चाटेचा मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप, म्हणाले 'पुरावा नष्ट झाला तर प्रशासन जबाबदारी...'
. पुरावे नष्ट झाल्यास याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का असा सवाल उपस्थित केलाय .;

Beed: राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेच्या मोबाईलवरून मोठा गदारोळ सुरू असताना दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर चांगलाच वाढलाय . आरोपांच्या घेरावात असणाऱ्या धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे . धनंजय मुंडे यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे . दुसरीकडे धनंजय देशमुख(Dhananjay Deshmukh) यांनी विष्णूचाटेच्या मोबाईलमध्ये मोठे पुरावे असल्याचं सांगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हे मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय . पुरावे नष्ट झाल्यास याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का असा सवाल उपस्थित केलाय . सर्व आरोपींचे रिमांड घ्या अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .(Santosh Deshmukh case)
विष्णू चाटेचा मोबाईल गायब करण्याचे षडयंत्र :धनंजय देशमुख
विष्णू चाटे याच्या मोबाईल मध्ये मोठे पुरावे आहेत. ते नष्ट करण्यासाठीच मोबाईल गायब करण्याचे षडयंत्र आहे. केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही: पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल करत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी केली आहे. विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या. असं ते म्हणाले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही. तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केलीय.. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते? असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक याचिका दाखल
संतोष देशमुख प्रकरणात मकोका अंतर्गत अडकलेल्या वाल्मिक कराडशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषिमंत्री असताना 88 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे .राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक बाबींची माहिती दडवल्याचा याचिकेत आरोप केलाय . मुंडे यांनी शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे .मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केलेला नाही .करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने,फ्लॅट,विमा पॉलिसी,सोन्याचे दागिने,तसेच बँकेतील जॉईन अकाऊंट,मालमत्ता आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे याची माहिती दडवून ठेवल्याचा याचिकेत आरोप आहे.औरंगाबाद खंडपीठाकडून मंत्री धनंजय मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आला आहे.निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
