एक्स्प्लोर
पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार नाही!

पुणे : शिवसेना-भाजप युतीच्या ब्रेकअपनंतर आता आघाडीही तुटली आहे. आगामी पुणे महानगपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही. आज यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांतील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता काँग्रेसच्या निरीक्षक मंडळाची महत्त्वाची बैठक काल मुंबईत झाली. मात्र त्यावेळी जागावाटपावर कुठलाही निर्णय झाला नाही. अशा परिस्थितीत आज केवळ औपचारिक घोषणा करुन दोन्ही पक्ष आघाडीतून काडीमोड जाहीर करतील. पुण्यात 67 जागा द्याव्यात असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीनं काँग्रेसला फक्त 60 जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे अखेर पुण्यात आघाडीचा काडीमोड होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























