एक्स्प्लोर

पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीव सातवांचीही लोकसभा निवडणुकीतून माघार?

हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीव सातव स्वतःहून माघार घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे राज्यातील दुसरे खासदारही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. हिंगोलीचे खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीव सातव स्वतःहून माघार घेत असल्याची चर्चा आहे. राजीव सातव यांच्यावर पक्षाने गुजरात राज्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सातव यांचा हिरमोड झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीव सातव स्वतःहून माघार घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. खासदार असूनही मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यात काम करण्याची योग्य संधी मिळाली नाही, अडवणूक झाली त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून सातव यांनी माघार घेतल्याचं म्हटलं जातं. हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड, कळमनुरी, किनवट, बसमत, हदगाव, हिंगोली हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील हदगाव आणि किनवट नांदेड जिल्ह्यात येतात. या दोन मतदारसंघात राजीव सातव यांना पक्षातून काम करण्यास अडवणूक होत असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण राज्यात येणार? राज्यात 2019 मध्ये सत्तांतर झालं आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आलं, तर अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असू शकतात. त्यामुळे अशोक चव्हाण लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचा चेहरा अशोक चव्हाण असू शकतात, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. ज्यामध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget