एक्स्प्लोर

Congress : अंधेरीतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद? आगामी बीएमसी निवडणुकीत फटका बसण्याची भीती

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.

 मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election)  शिवसेनेला (Shivsena)  पाठिंबा देण्यावरुन कॉंग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.  कॉंग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही कॉंग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची वोटबॅंक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणूकीत फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. 

काँग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.  काँग्रेसनं  स्वबळाचा नारा दिलेला असतांना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न आहे. 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके  यांच्या  निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे.  या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र, स्थानिक काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, मुंबईतील काही काँग्रेस नेते हे वेगळ्या मतप्रवाहाचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत  काँग्रेसच्या जगदिश आमिन कुट्टी या काँग्रेस उमेदवाराला तिस-या  क्रमांकाची 27 हजार मते मिळाली होती.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून  6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळणार का? शिंदे गटाऐवजी भाजप मैदानात उतरणार का? अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये सस्पेन्स कायम

Shivsena : ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर, निकाल तात्काळ लावा; शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Shirsat : पोलिसांमध्ये आक्रमकपणा नाही, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवरून सामाजिक न्याय मंत्र्यांनी पोलिसांवर फोडलं खापर, संजय शिरसाट म्हणाले...
पोलिसांमध्ये आक्रमकपणा नाही, राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवरून सामाजिक न्याय मंत्र्यांनी पोलिसांवर फोडलं खापर, संजय शिरसाट म्हणाले...
Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला एमआयएमने छ. संभाजीनगरच्या 'त्या' वस्तीत लपवून ठेवलं होतं, इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
निदा खानला एमआयएमने छ. संभाजीनगरच्या 'त्या' वस्तीत लपवून ठेवलं होतं, इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
Maharashtra Breaking 8th may 2026 LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Nagpur Kinnar Controversy: नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव; गंभीर गुन्ह्यातील उत्तम बाबाला पीठाधीश्वराच्या गादीवर बसवण्यावरून वाद, नेमकं प्रकरण काय?
नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव; गंभीर गुन्ह्यातील उत्तम बाबाला पीठाधीश्वराच्या गादीवर बसवण्यावरून वाद, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सुईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सुईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
Embed widget