एक्स्प्लोर

Shivsena : ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर, निकाल तात्काळ लावा; शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

Election Commission of India : धनुष्यबाण आपल्याच गटाला मिळावं अशी मागणी करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. 

मुंबई : ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून धनुष्यबान चिन्हाचा गैरवापर होतोय अशी तक्रार करत पक्षाच्या चिन्हाचा तात्काळ निकाल लावावा अशी मागणी शिंदे गटाकडून (Eknath Shinde) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) केली आहे. 4 ऑक्टोबर रोजी यासंबंधी एक पत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

येत्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आम्हाला हे चिन्ह मिळावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून या चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंबंधीची काही कागदपत्रं शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा केले आहेत. शिंदे गटाच्या या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. 

धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय उद्या लागण्याची शक्यता 

शिवसेनेतील (Eknath Shinde) झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाने शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे देखील आपल्याला मिळावं अशी मागणी करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. धनुष्यबाण कुणाचा यावर उद्या म्हणजे शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

शुक्रवारी या संबंधी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली बाजू मांडायला सांगितली आहे. एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

दोन्ही गटांचा दावा काय?

धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला असून आपापलं मतही व्यक्त केलं आहे. चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही, अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. तर शिंदे गटाचा दावा आहे की,  विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे.लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: खातं एकनाथ शिंदेंकडे, निर्णय मात्र मुख्यमंत्री घेताय, नागपूर जिल्ह्यात शक्तीपीठ आहे का?; शक्तिपीठ महामार्गविरोधाततील जनआंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला सवाल
खातं एकनाथ शिंदेंकडे, निर्णय मात्र मुख्यमंत्री फडणवीस घेताय, नागपूर जिल्ह्यात शक्तीपीठ आहे का?; शक्तिपीठ महामार्गविरोधाततील जनआंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला सवाल
Siddhivinayak Ganapati Mandir : सिद्धिविनायक मंदिर उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करणार, 500 कोटींच्या निधीत कोणतीही टक्केवारी घेणार नाही; सदा सरवणकरांनी स्पष्टच सांगितलं
सिद्धिविनायक मंदिर उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करणार, 500 कोटींच्या निधीत कोणतीही टक्केवारी घेणार नाही; सदा सरवणकरांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे धडाकेबाज निर्णय
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
Embed widget